मागे वळून पाहताना

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचणारे जेवढे थोर व सामान्य स्त्री-पुरूष या देशात झाले त्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावयास हवे.

पुढे वाचा

स्वप्नविक्या

सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत  तो गावात आला. लोकांना वाटलं की  ‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच.  लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय?  लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते. 

पुढे वाचा

इतिहास संशोधनातील ‘गजानन’

चंद्रपूरचे संशोधक प्रा. प्रशांत आर्वे पुण्यात आले होते. ते म्हणाले, “दादा, गेल्या तीन वर्षांपासून गभांना भेटायचा प्रयत्न करतोय. माझं त्यांच्याकडे काहीही काम नाही. या ज्ञानमहर्षीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी फक्त दोन मिनिटांचा त्यांचा वेळ हवाय. काहीही करून आमची भेट घडवून आणा.”

पुढे वाचा

गीता धर्मग्रंथ नाही!

गीता धर्मग्रंथ नाही!

– कमलाकर देसले 9421507434 साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021 ॥ 1 ॥ श्रीमद्भगवतगीता हा ग्रंथ भगव्या कपड्यात गुंडाळण्याचा धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहे, असा सर्वसाधारण समज समाजात आहे. अर्थातच हा समज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आणि एकूणच संतसाहित्याच्या बाबतीतही आहे. हे भारतीय समाजाचे भयंकर दुर्दैव आहे. त्यामुळे हे ग्रंथ वृद्धांनी किंवा प्रौढांनी वाचण्याचे ग्रंथ आहेत अशी एक चुकीची मान्यता समाजात रूढ झाली आहे. ते ही अतिशय चुकीचे आहे. गीता हा ग्रंथ समुपदेशनाची नितांत गरज असणार्‍या तरुणांसाठी आणि सर्वांसाठी आहे.

पुढे वाचा

यांची पोटं तरी केवढी?

यांची पोटं तरी केवढी?

– प्रवीण दवणे सुप्रसिद्ध लेखक, ठाणे 9820389414 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ राजाला शिकार कुठली, यापेक्षा शिकार करण्यात मजा येते. तो त्याचा खेळ असतो. तो पाठलाग! ते काटेकुटं चुकवणं, टपून नेम साधणं, मातीनं अंग माखणं याचीच नशा असते राजाला! तसा हा आमचा खेळ! घोटाळा करणं, लपवणं, हेलिकॉप्टरनं धावाधाव! त्या आमच्या नावाच्या ब्रेकिंग न्यूज! आम्हाला पैशात इंटरेस्ट नाय! मोप जमिनी, बागा, कारखाने, बार, गुरढोरं, बंगले-माड्या, सात हजार पिढ्यांना पुरेल एवढी इस्टेट आमची! पण आपण असं जनतेला चकवू शकतो, हीच आमची नशा! तुम्ही कवी आहात! तुमची नशा कवितेची! आमची घोटाळ्यांची!

पुढे वाचा

म्हाळसा कुठे गेली?

म्हाळसा कुठे गेली?

चपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची उत्तमोत्तम पुस्तके मागविण्यासाठी व्हाटस् अ‍ॅप क्रमांक – 7057292092 म्हाळसा कुठे गेली? असा काही प्रश्न होऊ शकतो का? मला वाटते असाही प्रश्न होऊ शकतो. या प्रश्नाची उत्तरे अनेक मिळू शकतात. उदाहरणार्थ, ‘जय मल्हार मालिका संपली. त्यामुळे म्हाळसा आता दिसत नाही’ असे एक उत्तर मिळू शकते. तसेच ‘म्हाळसा नेवाश्यातही असेल; कारण म्हाळसा ही खंडोबाची पत्नी होती.’ या म्हाळसेचे माहेर नेवासा होते. त्यामुळे म्हाळासेचे मंदिर नेवाश्यामध्ये आहे. इथे प्रश्नाचा शोध पूर्ण होतो पण हा शोध समाधान देणारा होत नाही. म्हणून पुन्हा शोध घ्यावासा वाटतो.…

पुढे वाचा

कुरुक्षेत्र

कुरुक्षेत्र

चपराक दिवाळी अंक 2020 अ‍ॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्‍याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.

पुढे वाचा

प्रहराचे ओझे सांभाळताना

प्रहराचे ओझे सांभाळताना

चपराक दिवाळी 2020 हा अंक मागविण्यासाठी आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 ती होती म्हणून मी आहे. हे मला माहिती आहे पण ती जी होती ती नेमकी कोण होती, कशी होती हे मात्र मला माहीत नाही. ती जी अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अगदी शंभरावी सुद्धा कोणालाच ओळखत नाही मी! पण खरंच ती होती आणि मी आज आहे. तिच्याच चिवट धाग्याला पकडून माझ्यातून उद्या पुन्हा ती असणारच आहे. उद्याची तीही कदाचित अशीच लिहिणार आहे. विचार करणार आहे.

पुढे वाचा

गुरुमंत्र

गुरुमंत्र

चपराक दिवाळी 2020 ‘चपराक प्रकाशन’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 एखाद्यावेळी भलताच गुरुमंत्र आपलाल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतो असं म्हणतात. मी तर गुरु करण्याच्या बाबतीत गुरुदेव दत्तांचं रेकॉर्ड मोडलं आहे. त्यांचे एकवीस गुरु होते, माझे अगणित गुरु आहेत. ज्या क्षणी आपण कुणाकडून काहीतरी शिकतो, ते त्यावेळचे गुरुवर्य!

पुढे वाचा

खोलवरच्या आवाजाला शब्द द्या!

खोलवरच्या आवाजाला शब्द द्या!

मराठवाड्यातील साहित्यिकांसाठी ‘चपराक’ मासिकानं वेगळा निर्णय घेतला. त्याची सुरूवात झाली मराठवाड्यातूनच!! नव्हे; महाराष्ट्रातून त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आल्या. लिहिणार्‍या हातांना हे पाठबळ हवंच आहे. आपल्या अभिव्यक्तीला व्यासपीठ ही कल्पनाच चांगली आहे पण मी मागच्या अंकात जी भूमिका मांडली ती अजून विस्तारानं यायला हवीय असं वाटल्यानं पुन्हा एकदा हा संवाद साधतो आहे.

पुढे वाचा