गझलसम्राट सुरेश भट – नागेश सू. शेवाळकर

अमरावती येथे डॉ. श्रीधर भट आणि त्यांची पत्नी शांताबाई यांचे वास्तव्य होते. 15 एप्रिल 1932 रोजी या दांपत्याच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रामनवमी! मोठ्या आनंदाने बारसे साजरे झाले. मुलाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. श्रीधर भट हे कान, नाक, घसातज्ज्ञ होते. अमरावती येथील त्यांच्या वसाहतीत अनेक जाती-धर्माचे लोक राहत होते. त्यातही ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम कुटुंबीय अधिक होते त्यामुळे साहजिकच डॉक्टरांना मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून बोलावे लागे. शांताबाईंनी घरकामासोबत सामाजिक कामांचा छंद जोपासला होता. शांताबाईंच्या कविता वाचनाच्या छंदातून सुरेशला लहानपणापासूनच काव्याविषयी आवड निर्माण झाली.

पुढे वाचा

मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान – माधवी देवळाणकर

कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

पुढे वाचा

प्रत्येक क्षणाची मजा घेतली – गौरव चाटी

भारतीय चित्रपटसृष्टीत, संगीत क्षेत्रात प्ले बॅक सिंगर आणि संगीतकार म्हणून काम करतोय. 25 जुलै 1994 रोजी जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझ्या आईने माझ्यातील कलाकाराला ओळखले कारण रेडिओवर दुरून जरी एखादं गाणं ऐकु आलं तरीही ते कान देऊन ऐकायचो. त्यात तल्लीन होऊन जायचो. घरातले डब्बे, दरवाजे, टेबल जे मिळेल त्यावर मी ठेका धरत असे त्यामुळे आईने मला गाण्याच्या क्लासला घातले. जसजसं वय वाढत गेलं तसातसा माझा गाण्याचा अभ्यास आणि रूची वाढत गेली. इंजिनीअरिंगचं धावपळीचं शेड्युल सांभाळून मी रियाज करायचो.

पुढे वाचा

मी आणि आई

‘मला मुलगी होणार, 15 ऑगस्टला होणार आणि मी तिला नृत्य शिकवणार!’’ मम्मी बोलत होती. आजी म्हणत होत्या, ‘‘अगं शोभा, आत्ता तुझी प्रकृती पाहता बाळाचा जन्म 15 ला नाही होणार…’’ पण मम्मी ठाम होती! आणि झालेही तसेच! मुलगी झाली, 15 ऑगस्टला झाली आणि फक्त शिक्षण नाही तर आयुष्यच नृत्यासाठी दिले गेले… इतकी ताकदीची इच्छाशक्ती होती माझ्या मम्मीची आणि ती मुलगी मी… संयोगिता…

पुढे वाचा

धक्का – संजय संत 

आपल्याला आयुष्यात अनेक सुखद, दु:खद, चांगले, वाईट, हवेसे, नकोसे धक्के बसतच असतात. काही व्यक्तिगत असतात व काही सामाजिक व राजकीय असतात. सामाजिक व राजकीय हे आपल्याला जरी धक्के वाटत असले तरी ते बरेचसे पूर्वनियोजित कवा प्रयत्नपूर्वक असतात. हा एक डावपेचांचा भाग असतो. धकाधकीचे जीवन हा शब्द ‌‘धक्का‌’ यावरूनच आला असावा. मुंबईकरांना तर धक्का हा रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. मोकळ्या लोकल कवा बेस्ट बसमधून प्रवास करताना चुकल्यासारखेच होत असेल. धक्क्याला लागणे असाही एक वाक्‌‍प्रचार वेगळ्या अर्थाने रूढ आहे. जहाजे कवा गलबते, छोट्या होड्या यांच्या जाण्या-येण्याच्या  काठाला सुद्धा ‌‘धक्का‌’ असेच…

पुढे वाचा

कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांची मुलाखत

कोणताही धर्म हा जोडण्याचंच काम करतो, तो माणसाला माणसापासून तोडत नाही हे मात्र नक्की. धर्मदंड हातात असलेली माणसं लोककल्याणासाठी नेमकं काय करतात हे जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…

पुढे वाचा

सामर्थ्यवान माता

सिंधुताई सपकाळ यांनी विसाव्या शतकात अनाथांना आणि बेघरांना आश्रय मिळवून दिला. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी सिंधुताई उभ्या राहिल्या. अनाथ मुलांचे प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले.

पुढे वाचा

भीमसेनास्त्र

पौराणिक काळात अशी काही अस्त्रे होती की जेंव्हा कोणावर सोडली जात ती तेव्हांच थांबत ज्यावेळी ज्यांच्यावर सोडली आहेत ते त्या अस्त्राला संपूर्ण शरण जातील. ‘भीमसेनास्त्र’ हे असे अस्त्र आहे की ते वारंवार आपल्यावर यावे म्हणून जगभर लाखो रसिक वर्षानुवर्षे त्यांना शरण जात आहेत. काही नावे फारच समर्पक आहेत. भीमसेन हे त्यातलेच एक नाव.

पुढे वाचा

कुविचारांची हजामत करणारा सेना न्हावी

‘आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक॥’ किंवा ‘जाता पंढरीसी। सुख वाटे जीवा॥’ हे अभंग आपण नेहमी ऐकतो, पण ते नेमके कोणी लिहिले असावेत? याविषयी काही कल्पना आहे का?

पुढे वाचा