प्राजक्ताचे सडे : पत्ररूप प्रस्तावना – न. म. जोशी

कोकणचे लेखक श्री. जे. डी. पराडकर यांचे प्राजक्ताचे सडे हे सलग सहावे पुस्तक चपराक तर्फे प्रकाशित झाले आहे. अल्पावधीतच साहित्य षटकार ठोकून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठा विक्रम केला आहे. या सहाव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांची सर्वांगसुंदर प्रस्तावना लाभली आहे. कोकणच्या मातीचा गंध सर्वत्र पसरविणारी ही प्रस्तावना खास चपराकच्या वाचकांसाठी. नक्की वाचा. प्रतिक्रिया कळवा आणि हे पुस्तक घरपोच मागविण्यास विसरू नका. त्यासाठी संपर्क – 7057292092  पत्ररूप प्रस्तावना श्री. जे. डी. पराडकर यांस, स. आ. ‘प्राजक्ताचे सडे’ या तुमच्या ललित लेखसंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी अशी विनंती…

पुढे वाचा

मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळं भयप्रद परिस्थिती निर्माण झालेली असतानाच विविध प्रांतात निसर्गाचं तांडवही अनुभवायला येत आहे. मागच्या वर्षी कोकण भागात निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार उडवला. यंदाही तौैक्ते वादळानं होत्याचं नव्हतं झालं आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या तडाख्यानं कोकणवासीयांचं अतोनात नुकसान झालं. नारळ, पोफळी, फणस, कोकम, जायफळाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वर्षांची झाडं उन्मळून पडली. डोळ्यादेखत सगळं भुईसपाट होऊनही कोकणी माणसानं धीर सोडला नाही. न खचता, न डगमगता तो पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता.

पुढे वाचा