हेच खरे जगज्जेते…

हेच खरे जगज्जेते...

– विनोद श्रा. पंचभाई 9923797725 ‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’ जगातील सर्वात मोठा क्रीडा स्पर्धांचा सोहळा असं ऑलिंपिक स्पर्धेचं वर्णन करण्यात येतं. यावेळी मात्र कधी नव्हे इतकी आव्हानात्मक परिस्थिती या सोहळ्यावर उद्भवली होती. त्याला कारणही तसंच होतं, अख्ख्या जगाला हादरवून सोडणारी कोरोना विषाणूची महाभयंकर साथ! त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा जवळपास एक वर्ष लांबणीवर पडली. 2020 साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा प्रत्यक्षात 2021 मध्ये पार पडली! यावेळी ऑलिंपिकच्या आधीच्या घोषवाक्यात पहिल्यांदाच एक महत्त्वपूर्ण शब्द जोडला गेला… तो म्हणजे एकत्र! ‘सिटियस, फोर्टियस, आल्टियस व कोम्युनिस’ अर्थात ‘वेगवान, सामर्थ्यवान, उत्तुंग आणि…

पुढे वाचा

प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा

प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा

देवेंद्र रमेश राक्षे ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 ‘प्लॅस्टिक, थर्माकोल शाप नाहीत, ते आधुनिक विज्ञानाचे वरदान आहेत’, ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’ असे सांगणारा जगातला मी पहिला ‘वेडा पीर’ ठरू द्या! पण अतिशय गांभीर्याने मी हे वाक्य लिहीत आहे आणि हे वाक्य लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी अतिशय कष्ट, मेहनत आणि प्रशिक्षण देखील घेतले आहे. ‘साधन’ या संस्थेतील माझे गुरु आणि शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव गाडगीळ यांच्या हाताखालील माझी साधना यांना स्मरून मी हे गंभीर वाक्य पुनः पुन्हा व्यक्त करीत आहे – ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’,…

पुढे वाचा

याजसाठी केला होता अट्टहास

याजसाठी केला होता अट्टहास

– डॉ. रामचंद्र देखणे 9503263046 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 आपल्या भूतकाळात जरा अंतर्मुख होऊन डोकावले की घडलेल्या प्रसंगांमधून आपल्याच जीवनातील एका जाणिवेची सृजनता सहजपणे उभी राहात असल्याचे जाणवते. त्यातील काही प्रसंग हे प्रेरणा देणारे असतात, काही स्वाभिमान जागवणारे, काही आवेश आणि उत्साह निर्माण करणारे, काही दिशादर्शी, काही कृतज्ञतेचे पथदर्शी, शांती, सुचित्व, आर्जव, स्थैर्य आणि अनहंकाराचे अनुदर्शन घडविणारे तर काही अहंकार जागविणारे, आत्मविश्वास गमावणारे, भविष्याच्या अंधार्‍या वाटेवर चाचपडायला लावणारे तर काही वैफल्य आणि उदासीनतेच्या गर्द छायेत लोटणारे! खरोखरीच जीवन म्हणजे अशा भिन्नभावदर्शी अनेकविध घटना आणि प्रसंगांचे एक संमेलनच असते. अशाच…

पुढे वाचा

गीता धर्मग्रंथ नाही!

गीता धर्मग्रंथ नाही!

– कमलाकर देसले 9421507434 साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021 ॥ 1 ॥ श्रीमद्भगवतगीता हा ग्रंथ भगव्या कपड्यात गुंडाळण्याचा धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहे, असा सर्वसाधारण समज समाजात आहे. अर्थातच हा समज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आणि एकूणच संतसाहित्याच्या बाबतीतही आहे. हे भारतीय समाजाचे भयंकर दुर्दैव आहे. त्यामुळे हे ग्रंथ वृद्धांनी किंवा प्रौढांनी वाचण्याचे ग्रंथ आहेत अशी एक चुकीची मान्यता समाजात रूढ झाली आहे. ते ही अतिशय चुकीचे आहे. गीता हा ग्रंथ समुपदेशनाची नितांत गरज असणार्‍या तरुणांसाठी आणि सर्वांसाठी आहे.

पुढे वाचा

दीक्षितसाहेब…

दीक्षितसाहेब...

साहित्य चपराक दिवाळी 2020 हा अंक घरपोच मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 बातमीवर, कामावर प्रेम असणारा असा झपाटलेला संपादक आम्ही पाहिला. माणूस पाहत पाहत शिकतो. आम्हीही त्यांच्याकडून हे गुण घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे काही सहकारी ग्रामीण भागातून आलो होतो. साहेबही ग्रामीण भागातूनच आले असल्यानं त्यांना बहुदा आमच्याबद्दल विशेष आस्था वाटत असावी. शिवाय साहेबांचं माणसांवर प्रेम होतं. माणूस जपला पाहिजे, असं ते नेहमी म्हणत.

पुढे वाचा

ब्रेकिंग न्यूजचा पोरखेळ

ब्रेकिंग न्यूजचा पोरखेळ

मंदार कुलकर्णी, पुणे 9922913290 साहित्य चपराक दिवाळी 2020 ‘सर्वांना महत्त्वाची वाटणारी घटना म्हणजे मुख्य बातमी’ या सूत्राकडून ‘त्या क्षणी ताजी असेल ती मुख्य बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज’ असं सूत्र विशेषतः टीव्ही वाहिन्यांनी आणलं. या सूत्रामुळे अनेक चुकीचे पायंडे पडले, दिशा बदलल्या. प्रेक्षकांसाठी म्हणून केलं जात आहे असं सांगितलं जात असलं तरी प्रेक्षकच यातून खूप त्रस्त व्हायला लागला. ब्रेकिंग न्यूजच्या सूत्रानं एकप्रकारे बातम्यांचा पोरखेळच करून टाकला. तो कुठपर्यंत चालणार? ‘श्रीदेवी की बॉडी का अभी इंतजार…’ कुठल्या तरी हिंदी चॅनेलवर ही ब्रेकिंग न्यूज वाचली तेव्हा खरं तर तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा वृत्त-प्रकार पचवायची…

पुढे वाचा

व्हायरस..!!

व्हायरस..!!

शिरीष देशमुख, मंगरूळ, जि. जालना साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2020 अंक मागवण्यासाठी संपर्क – 7057292092 ‘‘हायलो…’’ आबांनी थरथरत्या हातानं मोबाईल कानाला लावला. ‘‘आबा, मी सतु बोलतोय…’’ समोरून त्यांचा मुलगा बोलत होता.

पुढे वाचा

संपादकीय

संपादकीय

एकदा एक भविष्यवाणी झाली. ‘पुढची पंधरा वर्षे जमिनीत काहीच पिकणार नाही…’ ती ऐकून सगळे शेतकरी हवालदिल झाले. सगळ्यांपुढं मोठं प्रश्नचिन्ह! बरं, पंधरा वर्षे म्हणजे कालावधीही थोडाथोडका नव्हता. या वर्षात पिकलंच नाही तर खायचं काय? सगळेच चिंतेत होते. पंधरा वर्षे पिकणार नाही म्हटल्यावर रोज रानात जाण्याची गरज नव्हती. कामही करावं लागणार नव्हतं. पिकणारच नाही तर कष्ट करून काय फायदा? असा साधा-सोपा विचार होता. अशा सगळ्या वातावरणात गावातला रामू मात्र रोज रानात जायचा. त्यानं नांगरणी सुरू केली. त्याआधी रानातलं सगळं तण बाजूला सारलं. त्याचा हा खुळेपणा पाहून सगळे हसू लागले. एकानं विचारलं,…

पुढे वाचा

प्राक्तन – प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

प्राक्तन - प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 बहारो फुल बरसाओ, मेरा महेबूब आया है… हे गाणं मंडपात वाजायला लागलं आणि सार्‍यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडं वळल्या. अंगावर लाल रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचं नऊवारी भरजरी वस्त्र ल्यालेली नववधू मोठ्या डौलदार चालिनं एक एक पाऊल टाकत मंडपात प्रवेशकर्ती झाली. तिच्या खांद्यावर आपले हात ठेवत तिचा भावी पती आश्वस्त होत संयमानं तिच्या चालीशी स्वतःची चाल जुळवत तिच्या मागून चालत होता.

पुढे वाचा

‘अ’सरदार पटेल…!

ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची यांचा 'चपराक' दिवाळी अंकातील हा लेख

घटनेतील कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहात घेतला गेलाय. त्याआधी देशात सत्तांतर झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाची उजळणी सुरू झालीय. त्यासाठी जवाहरलाल नेहरूंची साक्ष काढली जाते! काश्मीरचा प्रश्‍न जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा पटेलांचं स्मरण केलं जातं. नेहरू आणि पटेल यांच्याशी असलेले परस्सर संबंध, महात्मा गांधी-नेहरु-पटेल यांच्यातील नातं, शिवाय कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लादणार्‍या पटेल यांच्याबद्दल संघ आणि भाजपेयी दाखवत असलेलं ममत्व! देशाची फाळणी होतानाच्या घडामोडीत पटेल-नेहरूंची भूमिका या सार्‍या घडामोडींचा परामर्ष घेणारा हा लेख! ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची यांचा ‘चपराक’ दिवाळी अंकातील…

पुढे वाचा