– प्रवीण दवणे सुप्रसिद्ध लेखक, ठाणे 9820389414 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ राजाला शिकार कुठली, यापेक्षा शिकार करण्यात मजा येते. तो त्याचा खेळ असतो. तो पाठलाग! ते काटेकुटं चुकवणं, टपून नेम साधणं, मातीनं अंग माखणं याचीच नशा असते राजाला! तसा हा आमचा खेळ! घोटाळा करणं, लपवणं, हेलिकॉप्टरनं धावाधाव! त्या आमच्या नावाच्या ब्रेकिंग न्यूज! आम्हाला पैशात इंटरेस्ट नाय! मोप जमिनी, बागा, कारखाने, बार, गुरढोरं, बंगले-माड्या, सात हजार पिढ्यांना पुरेल एवढी इस्टेट आमची! पण आपण असं जनतेला चकवू शकतो, हीच आमची नशा! तुम्ही कवी आहात! तुमची नशा कवितेची! आमची घोटाळ्यांची!
पुढे वाचाTag: rajkaran
कोणता झेंडा घेऊ हाती?
राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं कुणाच्याही घरादाराची रांगोळी सहजपणे होते. गंमत म्हणजे वरिष्ठ स्तरावरील नेते कधी एकमेकांशी शत्रूत्व करतात आणि कधी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करतात हे सांगता येणे शक्य नसल्याने या सगळ्यात हाडवैर निर्माण होते ते मात्र सामान्य कार्यकर्त्यांत.
पुढे वाचापोलीस यंत्रणेचा गैरवापर थांबायला हवा
पोलीस हा सामान्य नागरिक आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मध्ये उभा असलेला दुवा असतो. हा दुवा जेवढा सक्षम आणि कार्यक्षम पद्धतीने काम करेल तितकं सामाजिक स्वास्थ्य कायम रहायला मदत होईल.
पुढे वाचालाख बोलक्याहूनि थोर…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार!’ असं असूनही आपल्याकडं बोलत सुटणार्यांची कमतरता नाही. असं म्हणतात की, बाळाच्या जन्मानंतर त्याला बोलायला शिकायला काही दिवस जातात मात्र ‘काय बोलावं’ हे कळण्यासाठी सगळं आयुष्य निघून जातं. सध्या तरी समाजमाध्यमांमुळं प्रत्येक गोष्टीत माझी मतं मांडायलाच हवीत, कुणाला तरी समर्थन द्यायलाच हवं आणि कुणाला तरी विरोध करायलाच हवा अशी एक अहमहमिका लागलेली असते. यातून साध्य काय होणार याचाही कोणी विचार करत नाही.
पुढे वाचाआर्ट ऑफ ‘पॉलिट्रिक्स!’
‘‘अणीबाणी लोकांसाठी त्रासदायक असली तरी माझ्यासाठी ती चांगली होती. कारण ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, मोहन धारिया त्याकाळी आमच्या बडोद्याच्या घरात रहायला होते. मी पक्का संघवादी. अणीबाणीच्या काळात आमच्या घरातील या समाजवाद्यांचं वास्तव्य तिथं काम करणारा पोर्या बघत होता. तो या सगळ्यांना चहा देत होता, त्यांची सेवा करत होता.
पुढे वाचाभाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू
सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बंद खोलीतील भेट तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीतील अर्धातासाची चर्चा या परस्पर विरोधी घटना नक्की कशाचे द्योतक आहेत हे अनेकांना न समजणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या वळणावर आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पुढे वाचानिवडणुकीतली बाई
डॉ. वृषाली किन्हाळकर, नांदेड भारतातली बाई तशी नशीबवान आहे एका बाबतीत! मतदानाच्या हक्कासाठी तिला संघर्ष करावा लागला नाही! पण खरंच या गोष्टीचं काहीतरी मूल्य तिच्या मनात आहे का? मतदानाचा हक्क तिला आपसुकपणेच लाभलेला आहे पण मतदानाचा अर्थ प्रत्येक भारतीय बाईला कळलाय का? नवर्याच्या राजकारणामुळे माझा निवडणुकांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. गेल्या 25 वर्षांत सुमारे सहा सलग विधानसभा निवडणुका लढण्याच्या माझ्या नवर्याच्या अनुभवामुळे मला जे काही चित्र दिसलं, ते एक भारतीय माणूस म्हणून मी नोंदवून ठेवतेय माझ्या मनात.
पुढे वाचा