अमरावती येथे डॉ. श्रीधर भट आणि त्यांची पत्नी शांताबाई यांचे वास्तव्य होते. 15 एप्रिल 1932 रोजी या दांपत्याच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रामनवमी! मोठ्या आनंदाने बारसे साजरे झाले. मुलाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. श्रीधर भट हे कान, नाक, घसातज्ज्ञ होते. अमरावती येथील त्यांच्या वसाहतीत अनेक जाती-धर्माचे लोक राहत होते. त्यातही ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम कुटुंबीय अधिक होते त्यामुळे साहजिकच डॉक्टरांना मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून बोलावे लागे. शांताबाईंनी घरकामासोबत सामाजिक कामांचा छंद जोपासला होता. शांताबाईंच्या कविता वाचनाच्या छंदातून सुरेशला लहानपणापासूनच काव्याविषयी आवड निर्माण झाली.
पुढे वाचाTag: famous marathi book
प्राजक्ताचे सडे : पत्ररूप प्रस्तावना – न. म. जोशी
कोकणचे लेखक श्री. जे. डी. पराडकर यांचे प्राजक्ताचे सडे हे सलग सहावे पुस्तक चपराक तर्फे प्रकाशित झाले आहे. अल्पावधीतच साहित्य षटकार ठोकून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठा विक्रम केला आहे. या सहाव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांची सर्वांगसुंदर प्रस्तावना लाभली आहे. कोकणच्या मातीचा गंध सर्वत्र पसरविणारी ही प्रस्तावना खास चपराकच्या वाचकांसाठी. नक्की वाचा. प्रतिक्रिया कळवा आणि हे पुस्तक घरपोच मागविण्यास विसरू नका. त्यासाठी संपर्क – 7057292092 पत्ररूप प्रस्तावना श्री. जे. डी. पराडकर यांस, स. आ. ‘प्राजक्ताचे सडे’ या तुमच्या ललित लेखसंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी अशी विनंती…
पुढे वाचासामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या ‘अनोख्या रेशीमगाठी’
‘लोक काय म्हणतील?’ अशा प्रकारची सामाजिक भीती, समाजातला प्रत्येक समूह, प्रत्येक कुटूंब आणि प्रत्येक माणूस बाळगत असतो. त्याच ओझ्याखाली प्रत्येकजण आपले संपूर्ण आयुष्य, धडपडत जगत असतो. समाज नावाची स्वार्थी संस्था ही गंमत बघण्यात अघोरी आनंद मानणारी असते. त्यांना कोणाचे काय झाले, याच्याशी मतलब नसतो.
पुढे वाचा