निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? – किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक, राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत.

पुढे वाचा

स्थानिक विरुद्ध उपरा : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार राम सातपुते यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सोलापूरच्या संस्कृतीविषयी लिहून सातपुते हे बाहेरचे म्हणजे उपरे असल्याचे सांगितले. त्यावर सातपुते यांनीही त्यांना प्रतिउत्तर देत आपण सोलापूर जिल्ह्यातीलच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याचे आणि सोलापूरशी आपला नियमित संपर्क असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आणि एका ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी ही लढत आहे. दोघेही युवा नेते आहेत आणि आता लोकसभेसाठी आपले भवितव्य आजमावून पाहत आहेत. यानिमित्त स्थानिक भूमिपुत्र विरूद्ध बाहेरचा असा संघर्ष सुरू असला…

पुढे वाचा

फाईल आणि दादूमियाँ : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

दादूमियाँ उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ. स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी यांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. नरेंद्र मोदी दादूमियाँच्या घरी येणार्‍या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात एमआयटीने आयोजित केलेल्या ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहर्‍यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला.

पुढे वाचा

उद्योजकांना वापरा, कामे सामान्यांची करा! | किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्यातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून जायचे. ते केंद्रीय संरक्षण उत्पादन मंत्री होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे ते चिरंजीव. काकासाहेब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चांगली मैत्री होती. एकदा बॅरिस्टर गाडगीळ दिल्लीला गेले असता डॉ. आंबेडकरांना भेटले. त्यावेळचा किस्सा ते रंगवून सांगायचे. त्यांच्या चेहर्‍यावर किस्से सांगताना कायम एक मिश्किल हास्य असायचं. बाबासाहेबांनी त्यांना विचारलं, ‘‘तू काय काम करतोस? दिल्लीत कसा आलास?’’

पुढे वाचा

माय लेक -राजेंद्र दिघे

माय नितळ गोडवा लेक साखर पाडवा माय प्रेमाचा निर्झर लेक आनंदी पाझर माय कष्टाची भाकर लेक लाडाची कदर माय सुंदर आभाळ लेक नितळ निर्मळ माय अंगणी तुळस लेक घराची कळस माय प्रेमाचा सागर लेक कुळाचा जागर माय वाढता मांडव लेक नात्यांचा सांकव माय गोकूळ आरसा लेक वंशाचा वारसा माय सुखाचा आगर लेक दुःखाला झालर -राजेंद्र दिघे

पुढे वाचा

गझलसम्राट सुरेश भट – नागेश सू. शेवाळकर

अमरावती येथे डॉ. श्रीधर भट आणि त्यांची पत्नी शांताबाई यांचे वास्तव्य होते. 15 एप्रिल 1932 रोजी या दांपत्याच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रामनवमी! मोठ्या आनंदाने बारसे साजरे झाले. मुलाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. श्रीधर भट हे कान, नाक, घसातज्ज्ञ होते. अमरावती येथील त्यांच्या वसाहतीत अनेक जाती-धर्माचे लोक राहत होते. त्यातही ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम कुटुंबीय अधिक होते त्यामुळे साहजिकच डॉक्टरांना मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून बोलावे लागे. शांताबाईंनी घरकामासोबत सामाजिक कामांचा छंद जोपासला होता. शांताबाईंच्या कविता वाचनाच्या छंदातून सुरेशला लहानपणापासूनच काव्याविषयी आवड निर्माण झाली.

पुढे वाचा

सरीवर सरी – श्रद्धा बेलसरे-खारकर

सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांचे हे नवे सदर या अंकापासून देत आहोत. बेलसरे यांचे ‘मोरपंखी’, ‘आजकाल’ आणि ‘फाईल व इतर कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘टिकली तर टिकली’ हा ललितलेखसंग्रह आणि ‘सोयरे’ हा व्यक्तिचित्रणाचा संग्रह प्रकाशित आहे. त्यांचे ‘डबल बेल’ हे एस.टी.मधील अभिनव उपक्रमाचे अनुभवकथनही प्रकाशित आहे. त्यांनी अनेक मान्यवर वृत्तपत्रांसाठी सदर लेखन केले असून त्यांना ‘कवी कट्टी’, ‘पद्मश्री विखे पाटील’, दूरदर्शनचा ‘हिरकणी’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या आठ मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे अनुभवांचे संचित मोठे आहे.…

पुढे वाचा

उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वाचे राज्य… महाराष्ट्र! – संजय सोनवणी

जसे माणसाला एक व्यक्तिमत्त्व असते तसेच व्यक्तिमत्त्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तिच्या जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्त्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्त्व ही बाब मानवी जीवनात महत्त्व घेऊन बसते. व्यक्तिला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्त्व जबाबदार असते.

पुढे वाचा

वाचन ही ‘संस्कृती’ आहे काय? – घनश्याम पाटील

भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मनाने किंवा धनाने खूप श्रीमंतच आहेत असंही चित्र नाही. मग तरूण, महाविद्यालयीन मुलं-मुली…

पुढे वाचा

ज्ञानेश्वरीतील वसंतऋतू…

ज्ञानेश्वरी हा मराठी माणसांच्या जीवनातील कोहिनूर आहे. जीवनाच्या आणि निसर्गाच्या सर्व बाजूला स्पर्श करणारा परीस आहे. या परिसाच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचे सोने झाले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्गाचा मुक्त वावर आहे. निसर्गातील चराचर सृष्टीचे दर्शन वेळोवेळी यामध्ये दिसून येते.

पुढे वाचा