माझा गणेश – जयेंद्र साळगांवकर

माझा जन्मच मालवणचा! माझे वडील स्व. जयंतराव साळगांवकर हे लहानाचे मोठे मालवणमध्येच झाले. पुढे ते नोकरीकरिता मुंबईला आले आणि येथेच स्थायिकही झाले. तरी दरवर्षी गणेश चतुर्थीला आम्ही सर्व कुटुंबीय मालवणला जाऊन घरी गणेशाची मूर्ती आणून, तिची यथासांग पूजा करून आणि पाचव्या दिवशी विसर्जन करूनच मुंबईला परतत असू. अनेक वर्षे हे सुरू होते. मुंबईला जेव्हा त्यांनी एक इमारत विकत घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या आई म्हणजे आमच्या आजी स्व. इंदिराबाई साळगांवकर यांच्याशी विचारविनिमय करून गणपती मुंबईत आणावयास सुरुवात केली. तीच प्रथा अजूनही आमच्या कुटुंबात सुरू असून आमच्या समस्त साळगांवकर कुटुंबाचा तो एकच…

पुढे वाचा

‘चपराक’चा ज्ञानमयी गणेशोत्सव – घनश्याम पाटील

सस्नेह जय गणेश! आळंदी-पंढरपूरची भक्तिमय वातावरणात अविरतपणे सुरु असलेली वारी, गणेशोत्सव आणि दिवाळी अंक या तीन परंपरा मराठी माणसाच्या अस्मितेच्या, गौरवाच्या आहेत. ‘चपराक’ मासिकाने वारीच्या निमित्ताने सातत्याने दर्जेदार साहित्य दिलेले आहेच. दिवाळी अंकाच्या परंपरेत तर ‘चपराक’चा अंक अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावर्षीपासून दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पांचा विशेषांक प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. खरेतर गणपती म्हणजे विद्येची देवता! प्रत्येक कामाची मंगलमय सुरुवात म्हणजे श्रीगणेशा!! ‘त्याच्या’ कृपेने प्रत्येक कार्य तडीस जाते, अशी आपली दृढ श्रद्धा. अनेकांनी ती अनुभूती आपापल्या पातळीवर घेतलेली असते. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळकांनी हा…

पुढे वाचा

योगाचे निर्माते प्राचीन जैन तत्त्वज्ञ, योगाचे प्राचीन नाव ‘व्रत’ – संजय सोनवणी

योग हा प्रथम उपनिषदांमध्ये विशद केला आहे असे मानले जाते. उपनिषदे वेदांचे शेवटचे भाग मानले जातात. म्हणून त्यांना वेदांत असे म्हणण्याचीही प्रथा आहे. प्रत्यक्षात उपनिषदात येणारे तत्त्वज्ञान हा ऋग्वेदात येणार्‍या भौतिकवादी विचारांचा तार्किक विस्तार असू शकतो की नाही यावर वाद झाला आहे व पुढेही होत राहील. प्रत्यक्षात मात्र उपनिषदे ज्या आध्यात्मिक क्षेत्रांचा शोध घेतात त्यामागील आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी केल्या जाणार्‍या विधीविधानात दोन धृवाचे अंतर आहे असे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे दोन्ही तत्त्वज्ञाने एकमेकांना जोडणे ही अभ्यासकांची गंभीर चूक असू शकते.

पुढे वाचा

परिवर्तनाची शक्ती देणारी वारी

महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे आणि तरी ते ‘महा राष्ट्र’ आहे. या महाराष्ट्राने समाजाच्या उद्धाराकरिता विचारांची पेरणी केली आहे. या मातीने अनेक विचारवंत दिले. या भूमीने या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला जसे अनेक क्रांतीकारक दिले त्याप्रमाणे समाजाचे उत्थान घडवण्यासाठी विचारवंत देखील दिला आहेत. या भूमीने सतत माणूसपणाचा विचार केला आहे. या मातीत जे उगवले होते त्यामागे विचारांची पेरणी हेच कारण आहे. पेरलेल्या विचारबीजांमुळे येथील भूमी अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे येथील माणसं अधिक विचारप्रवण बनली होती. जे जे म्हणून चांगले आहे त्याचा स्वीकार करत या भूमीत सतत समतेचा लढा उभा…

पुढे वाचा

उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वाचे राज्य… महाराष्ट्र! – संजय सोनवणी

जसे माणसाला एक व्यक्तिमत्त्व असते तसेच व्यक्तिमत्त्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तिच्या जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्त्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्त्व ही बाब मानवी जीवनात महत्त्व घेऊन बसते. व्यक्तिला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्त्व जबाबदार असते.

पुढे वाचा

वाचन ही ‘संस्कृती’ आहे काय? – घनश्याम पाटील

भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मनाने किंवा धनाने खूप श्रीमंतच आहेत असंही चित्र नाही. मग तरूण, महाविद्यालयीन मुलं-मुली…

पुढे वाचा

मराठवाड्यातील खाद्यसंस्कृती

अश्मयुगीन कालखंडापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत मानवाच्या जीवनात वेगवेगळे बदल होत गेले. संस्कृती बदलल्या. जीवनमान बदलले. अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजा मात्र कधीच बदलल्या नाहीत. गरजांचे स्वरूप फक्त बदलले, कंदमुळे खाणारा आदिमानव आणि विविध पदार्थ चवीनं खाणारी आजची पिढी या दोन बिंदूच्या मध्ये असलेला भक्कम खाद्यप्रवास निश्चितच रंजक, ज्ञानवर्धक आणि विशेषतः भूकवर्धक आहे.

पुढे वाचा

मराठी जीवनभाषा व्हावी

मराठी भाषा गौरव दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होईल. ‘नेमिची मग येतो पावसाळा’ या न्यायाने दिन साजरे होत राहतात. कधी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. यासारखे अनेक उपक्रम करत आपण मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. शासनही वेगवेगळे आदेश देऊन मराठी संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीत स्वाक्षरीची सक्ती आणि सर्व पत्रव्यवहार मराठीत करणे याबाबत सक्ती केली जाते. सारे करूनही मराठी ज्ञानभाषेचा प्रवास करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. केवळ उत्साही असेच कार्यक्रमाचे…

पुढे वाचा

एकविसावे शतक आणि छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज.

छ. शिवरायांसाठी ‘युद्ध’ हे साधन होते, आणि स्वराज्य निर्मिती हे त्यांचे ‘साध्य’ होते. त्या स्वराज्य निर्मितीचा उद्देश, छ शिवरायांच्या भूमिका काय होत्या ? यासंदर्भाने आम्ही शिवचरित्राकडे पाहतो का ? खरेतर आज लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असताना अशा २१ व्या शतकात सुद्धा त्यांचा उदोउदो का व्हावा ?

पुढे वाचा

प्रथा – परंपरा नाकारताना!

कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं… ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्‍या प्रतिक्रियांची.

पुढे वाचा