घनश्याम वसंतराव पाटील

गेली 21 वर्षे पूर्ण वेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ‘साहित्य चपराक’ आणि ‘लाडोबा’ या दोन मासिकांचे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक’ आणि ‘लाडोबा’ या प्रकाशन संस्थांचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे स्वतंत्र संपादक.

ऐंशीहून अधिक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. ‘साहित्य चपराक’च्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे मराठी ग्रंथालय, मुंबई मराठी ग्रंथलेखक संघ, उद्योगवेध असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. ‘दखलपात्र’ व ‘झुळूक आणि झळा’ हे अग्रलेखांचे दोन संग्रह प्रकाशित. ‘अक्षर ऐवज’ हे समीक्षा लेखांचे पुस्तक प्रकाशित. ‘दरवळ’ हे चौथं पुस्तक. राज्यातील महत्त्वाच्या दैनिकांसाठी स्तंभलेखन. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘चपराक’च्या माध्यमातून आजवर कथा, कविता, ललित, वैचारिक, अध्यात्म, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं प्रकाशित. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात सहभाग. पहिल्या धनगर-आदिवासी साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे अध्यक्ष. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. चौथ्या एकता साहित्य संमेलनाचे उद्धाटक. बाराव्या समरसता विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. पुण्यातील नामवंत असलेल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य. प्रकाशक संघ तसेच अनेक संस्थांच्या परिसंवादात, व्याख्यानमालात सहभाग.

दरवर्षी किमान पाचशे सर्वोत्तम पुस्तकं प्रकाशित करावीत, त्यातल्या किमान 25 पुस्तकांच्या एक लाखाहून अधिक प्रती विकल्या जाव्यात या ध्येयानं कार्यरत. ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायानं दुर्गम भागातील लेखकांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न. विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभाग.


चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID