छत्रपती शिवाजीराजांचे व्यापारविषयक धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. रायगड ही मराठ्यांची नवी राजधानी म्हणून ओळखली जावू लागली. रायगडावर महाराजांनी राजदरबारापासून विविध इमारती बांधल्या. रायगड हा सुसज्ज गड तयार केला. रायगडावरील भव्य, देखणी व सुसज्ज बाजारपेठ हे शिवाजी राजांच्या व्यापारविषयक धोरणांवर प्रकाश टाकते.

पुढे वाचा

इतिहास संशोधनातील ‘गजानन’

चंद्रपूरचे संशोधक प्रा. प्रशांत आर्वे पुण्यात आले होते. ते म्हणाले, “दादा, गेल्या तीन वर्षांपासून गभांना भेटायचा प्रयत्न करतोय. माझं त्यांच्याकडे काहीही काम नाही. या ज्ञानमहर्षीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी फक्त दोन मिनिटांचा त्यांचा वेळ हवाय. काहीही करून आमची भेट घडवून आणा.”

पुढे वाचा

श्रीमंत योगी

श्रीमंत योगी

उमेश सणस शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक 9822639110 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचित घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडं घडला.

पुढे वाचा

कॅलिडोस्कोप – हायव्होल्टेज ड्राम्यांचा!

कॅलिडोस्कोप - हायव्होल्टेज ड्राम्यांचा!

केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली आणि चर्चा सुरू झाली ती हायव्होल्टेज ड्राम्याची! एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडणे आणि त्याभोवती सगळे गरगरा फिरणे म्हणजे हायव्होल्टेज!

पुढे वाचा

इतिहास जगणारा माणूस

इतिहास जगणारा माणूस

इतिहासाच्या अभ्यासामुळं माणसं वेडी होतात आणि वेडी झालेली माणसं इतिहास घडवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानं महाराष्ट्राला गेली साडेतीनशे वर्षे गारूड घातलेलं आहे आणि हा इतिहास गेली शंभर वर्षे जगणार्‍या माणसाचं नाव म्हणजे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे!

पुढे वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराज. मरगळलेल्या मनात चेतनेचा संचार करवणारा प्रेरणामंत्र. हा शब्द म्हणजे महाराष्ट्राचा उर्जस्वल इतिहास. मार्गदर्शक वर्तमान आणि दिशादर्शक भविष्य आहे. कितीही नकारात्मक परिस्थितीशी झगडण्याचं बळ देणारा हा मंत्र आहे. छत्रसालपासून ते नेताजी सुभाषबाबूंपर्यंत कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे हे अद्भूत व्यक्तीमत्व.

पुढे वाचा

पुरंदरचा तह

पुरंदरचा तह

रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या पंधराव्या वर्षी आपले बालमित्र आणि मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि आदिलशाही व मोगलशाही विरुद्ध उघड संघर्षाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेईपर्यंत आलमगीर औरंगजेबाचा सर्वात मोठा शत्रु म्हणजे आदिलशाहीच होती पण १६५९ साली शिवाजी महाराजांनी स्वतः प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून वध केला आणि या घटनेने औरंगजेबाच्या मनातही जबर भीती निर्माण केली.

पुढे वाचा

शिवप्रताप

शिवप्रताप

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित कादंबरीचे हे एक प्रकरण. ‘चपराक प्रकाशन’ची सर्वोत्कृष्ट निर्मिती असलेल्या या शिवदिग्वीजयाच्या रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कादंबरीची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवराज्याभिषेकदिनानिमित्त हे प्रकरण जरूर वाचा. आपल्या अभिप्रायाचे स्वागत.

पुढे वाचा

शांतता प्रस्थापित करण्यासाठी हवी शस्त्रसज्जता!

शांतता प्रस्थापित करण्यासाठी हवी शस्त्रसज्जता!

चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क – 7057292092 कोणतीही क्रांती ही शस्त्राशिवाय होत नाही असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या बळावर जुलूमी रावजटीविरूद्ध संघर्ष उभारला आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आजही अनेकदा स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलण्याशिवाय पर्याय नसतो. इतरांवर वार करण्यासाठी शस्त्र वापरणे चुकीचेच पण स्वतःवरील हल्ला परतवून लावायचा असेल, राष्ट्राच्या संरक्षणासाठी सीमेवर निधड्या छातीनं उभं रहायचं असेल तर शस्त्राशिवाय पर्याय उरत नाही. आज आपल्या अशा अनेक मर्दानी खेळांचा, रांगड्या वृत्तीचा, अशा शस्त्रास्त्रांचा आपल्याला विसर पडता असतानच कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर…

पुढे वाचा