कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांची मुलाखत

कोणताही धर्म हा जोडण्याचंच काम करतो, तो माणसाला माणसापासून तोडत नाही हे मात्र नक्की. धर्मदंड हातात असलेली माणसं लोककल्याणासाठी नेमकं काय करतात हे जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…

पुढे वाचा

प्रमुख अतिथी

मार्च महिना संपला होता. तालुक्यातील अनेक शाळांतील वार्षिक स्नेहसंमेलने संपन्न झाली होती. आम्ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्नेहसंमेलन घेत असू. यावर्षी मात्र दुष्काळामुळे ते घ्यावे की नाही या द्विधा मन:स्थितीत होतो.

पुढे वाचा

राष्ट्रज्योत तेवत ठेवणारे बेंद्रे

असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात!

पुढे वाचा

भूमिका न घेणं हीच भूमिका!

मराठी भाषा दिन साजरा करताना आपण फक्त भाषेविषयी चिंता व्यक्त करणं किंवा फुकाचा अभिमान बाळगणं यापेक्षा काही मूलभूत चिंतन करून भाषेला बळ दिलं, लेखक-प्रकाशकांना प्रोत्साहन दिलं तरच ही परिस्थिती बदलू शकेल.

पुढे वाचा

मातृभाषा ज्ञानभाषा व्हावी

मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असं म्हणणार्‍या आया आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणारे भुरटे साहित्यिक व राजकारणी आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह.’ म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडणे’ असते. याउलट आपले संत म्हणतात, ‘माझी इश्वरावर प्रीत जडली’. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात, ‘मराठीत प्रेम जडतं आणि इंग्रजीत…

पुढे वाचा

एकविसावे शतक आणि छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज.

छ. शिवरायांसाठी ‘युद्ध’ हे साधन होते, आणि स्वराज्य निर्मिती हे त्यांचे ‘साध्य’ होते. त्या स्वराज्य निर्मितीचा उद्देश, छ शिवरायांच्या भूमिका काय होत्या ? यासंदर्भाने आम्ही शिवचरित्राकडे पाहतो का ? खरेतर आज लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असताना अशा २१ व्या शतकात सुद्धा त्यांचा उदोउदो का व्हावा ?

पुढे वाचा

व. पु. काळे – माझे दोस्त!

ही गोष्ट आहे २००७ ची. गांधीभवनाच्या पायर्‍यावर बसून आम्ही  यमुनामाईंनी केलेली पिठलं-भाकरी खाल्ली. लोककवी म. भा. चव्हाण हे आमचे ज्येष्ठ मित्र. ते व. पु. काळे यांच्या आठवणीने व्याकूळ झाले होते. त्यांना म्हटलं, ‘‘मभा, हे सगळं लिहून काढा. मी चपराकमध्ये छापतो.’’  ते म्हणाले, ‘‘लेखनाबाबत माझा महाआळशी स्वभाव तुम्हाला माहीतच आहे. इच्छा तीव्र आहे पण कागदावर कधी उतरेल माहीत नाही.’’  मग मी त्या भारावलेल्या अवस्थेतच माझ्या बॅगमधून कागद काढले. म. भा. मंत्रमुग्धपणे बोलत होते आणि माझ्याकडून झर्रझर्र ओळी कागदावर उमटत होत्या. का माहीत नाही, पण त्यावेळी हा लेख लिहून झाल्यावर मी खूप…

पुढे वाचा

मागे वळून पाहताना

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचणारे जेवढे थोर व सामान्य स्त्री-पुरूष या देशात झाले त्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावयास हवे.

पुढे वाचा

सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50

ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली जाते… ही गोष्ट आहे तीन पिढ्यांनी चालवलेल्या आणि तीन पिढ्यांनी आपलं मानलेल्या एका अशा दिनदर्शिकेची जी आता महाराष्ट्राचे मानचिन्ह…

पुढे वाचा

चपराकचा अनोखा अमृत महोत्सव

वर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले असणे साहजिक आहे. प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून मनात भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक,राष्ट्रपुरूषांबददलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सरकार,विविध सामाजिक संघटना,संस्था विविध कार्यक्रम करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक जन अत्यंत उत्सवाने सहभाग देत आहे. काही लोक देशभक्तीचा विचार मनात कायम ठेऊन असतात. आपला व्यवसाय जोपासत असतानाही राष्ट्रभक्तीशी तडजोड करत नाही. काही लोक नेहमीच आपले वेगळेपण कायम ठेवत असतात. त्यांच्या पाऊलवाटा नेहमीच वेगळ्या दिशेने चालत असतात. त्याकरीता त्यांची धडपड…

पुढे वाचा