विषमतेचा पाया समता कशी आणणार?

भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही.

पुढे वाचा

सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50

ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली जाते… ही गोष्ट आहे तीन पिढ्यांनी चालवलेल्या आणि तीन पिढ्यांनी आपलं मानलेल्या एका अशा दिनदर्शिकेची जी आता महाराष्ट्राचे मानचिन्ह…

पुढे वाचा

भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू

भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू

सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बंद खोलीतील भेट तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीतील अर्धातासाची चर्चा या परस्पर विरोधी घटना नक्की कशाचे द्योतक आहेत हे अनेकांना न समजणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या वळणावर आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पुढे वाचा

माझं बहुमूल्य मत वाया गेलं

माझं बहुमूल्य मत वाया गेलं

ज्या प्रमुख उमेदवाराच्या भरवशावर मी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान केलं होतं ते महत्त्वाचं मत वाया गेलं. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता कुठे उभे आहोत आपण? मला अक्षरशः आपला महाराष्ट्र एका अनाथ मुलासारखा भासायला लागला आहे.

पुढे वाचा

भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?

भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा कोणताही आजार नसून जो या रोगानं मरतो तो गांडू अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी सातत्यानं केली. हे सगळं पाहता वाटतं…

पुढे वाचा

राज ठाकरे यांची सूचना स्वागतार्ह

राज ठाकरे यांची सूचना स्वागतार्ह

महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शहरीकरण झालंय. आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आपल्याकडं आहे जी भारताची आर्थिक राजधानी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती यासारख्या विशाल महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील चाळीस टक्केपेक्षा अधिक भागाचं शहरीकरण झालेलं आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग ठेऊन काम करणं महाराष्ट्रात शक्य होत नाही. भारतभरातून महाराष्ट्रात लोक उद्योगधंद्यासाठी आणि रोजगारासाठी येत असतात. भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस पुण्या-मुंबईत आहे असं म्हटल्यास तीही अतिशयोक्ती होणार नाही. या सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन महाराष्ट्र पुढे चाललेला असतो. अशा परिस्थितीत कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्रात सर्वाधिक…

पुढे वाचा