कथा हा अतिशय लवचिक असा वाङमयप्रकार आहे. संस्कृतिच्या प्रारंभापासून कविता आणि कथा लिहिल्या जातात. पुढे नाटक आले. म्हणजे साहित्याचे हे मूळ आविष्कार रूपे होत. कथा ही लवचिक असल्यामुळे ती असंख्य रुपात व्यक्त झालेली आहे. होऊ शकते. लघुत्तम कथा, लघुकथा, गोष्ट, कथा, दीर्घकथा, धक्कांतिका अशा विविध रुपात कथा लिहिली गेली. कमीत कमी अवकाशात खूप काही सूचित करण्याचे सामर्थ्य कथा या वाङ्मय प्रकारात असते. शिवाय काही अनुभवच असे असतात की, कथेशिवाय ते अनुभव इतरत्र व्यक्त होऊच शकत नाहीत. एक प्रकारची अपरिहार्यताच तेथे असते. येथे ’सारांश कथा’ हा एक प्रयोग आहे. कमीत कमी…
पुढे वाचाTag: marathi katha
मार्गस्थ (कथा) – अनिल राव
सभागृह संपूर्णपणे भरायला आलं होतं. आज विठ्ठल पांडुरंग कापडनेकर यांची ‘मार्गस्थ’ ही दहावी कादंबरी प्रकाशित होत होती. त्यांची आजपावेतो चोवीस पुस्तके प्रकाशित झाली होती. आजचे पंचविसावे पुस्तक प्रकाशित होत होते. साहित्य क्षेत्रातील ते एक मोठं प्रस्त होतं. सदोदित हसत-खेळत राहणारं व्यक्तिमत्त्व होतं. सगळ्यांना आपलेसे करणारे साहित्यिक असा त्यांचा नावलौकिक होता. आजपर्यंत त्यांचे साहित्य ज्या ज्या प्रकाशकांनी प्रकाशित केले होते त्यांनी सर्वांनी मिळून आजचा हा मोठा समारंभ आयोजित केला होता.
पुढे वाचाकष्ट-त्याग-समर्पणाची गाथा- ‘अग्निदिव्य’
एका स्त्रीचा स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ ‘अग्नितांडव’ न राहता तो ‘अग्निदिव्य’ कसा बनत गेला, याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रात्मक पुस्तकात आहेत. एका महिलेने व तिच्या मुलाने केलेला संघर्ष म्हणजे हे पुस्तक अशीच प्राथमिक ओळख या पुस्तकाची करून द्यावी लागेल.
पुढे वाचाझिपरीचा माळ – समीर गायकवाड
गावातल्या सगळ्या गल्ल्या ओलांडून डाव्या अंगाने गावाबाहेर पडलं की आमराई लागते. आमराईतून जाताना सावल्यांचा काचबंदी खेळ अंगावर झुलत राहतो. कवडशांच्या गर्दीतून अंग झटकत दोन कोस चालत गेलं की आधी केकताडांनी वेढलेला झिपरीचा माळ लागतो. दहा-बारा एकराचं हे सगळं रान सुपीक मातीचं पण इथं नांगराचा फाळ कधी लागला होता हे गावातल्या कुणालाच सांगता येत नव्हतं. काळीभोर मऊशार जमीन असल्यानं घासगवतापासून बोरी-बाभळीपर्यंतची सगळी झाडं एकमेकाच्या अंगाला खेटून पार फांदीत गळे गुतवून ताठ उभी होती. आमराईपासून नजर टाकली की हे एक जंगलच वाटे. भरीस रात्रंदिवस कानावर पडणारे पक्षांचे हरतऱ्हेचे आवाज आणि जोडीला मोकाट…
पुढे वाचासिद्धी : कथा – सुनील माळी
तो घाईघाईतच रात्री नवाच्या सुमारास आपल्या ऑफिसमधून बाहेर पडला. तसा उशीरच झाला होता पण न जाऊन चालणार नव्हते. त्याच्या जवळच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाचे रिसेप्शन होते रामकृष्ण गार्डनला. पत्रिकेवर दिलेली वेळ संध्याकाळी सात ते दहा अशी होती पण जेवढ्या लवकर आपण पोहोचू तेवढी जास्त माणसे भेटतील, आता आपण निघालो तर किमान एक तास तरी मिळेल, या अपेक्षेने त्याने गाडीला किक मारली.
पुढे वाचाहळवा कोपरा – प्रस्तावना
संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे.
पुढे वाचाकस्तुरीगंध – प्रस्तावना
प्रा. बी. एन. चौधरी हे खान्देशातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी साहित्याच्या विविध प्रांतात यशस्वी मुसाफिरी केली आहे. ‘माणूस माणूस जोडत जावा’ या सूत्रानुसार त्यांचं जगणं आणि वागणं आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी ते सहजपणे एकरूप होतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटतं. प्रस्तुतच्या ‘कस्तुरीगंध’ संग्रहातील कथा म्हणजे मानवी भावभावनांवर आधारित सुसंस्कृत जगण्याची शिदोरीच आहे. मातृप्रेमात अखंड डुंबलेल्या या अवलियाच्या शब्दांचा गंध साहित्यक्षेत्रात सर्वत्र दरवळतोय आणि एक अनोखे चैतन्य निर्माण करतोय. या संग्रहातील कथा वाचताना जागोजागी त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच साहित्याच्या प्रांतात या कथासंग्रहाच्या रुपाने दमदार भर पडली…
पुढे वाचाहतबल – कथा
‘‘हे बघ श्रीपती, असा मौका परत येणार नाही. तुझ्या त्या पडीक माळरानात तसंही काहीच पिकत नाही. तुझे वडील होते तोपर्यंत ठीक होतं पण आता ते हयात नाहीत. किती दिवस ते दगडगोटे भावनेच्या आहारी जाऊन सांभाळणार आहेस? बघ, थोडा तरी व्यवहारी हो, कुणाला काय वाटेल याचा फार विचार करू नकोस. लक्ष्मी स्वत:हून तुझ्या दारापर्यंत चालून आली आहे. तिला असं लाथाडू नकोस…’’ श्रीपती फक्त शांतपणे ऐकून घेत होता. ‘‘ती बिनकामी जमीन विकून टाकलीस तर एक रकमी चांगले दहा-बारा लाख रुपये मिळतील. तू जर म्हणत असलास तर अजून रक्कम वाढवून मागू शेठकडून! बघ,…
पुढे वाचादेवपूजा – सुनील भातंब्रेकर, पुणे
‘जय जय रघुवीर समर्थ’!! ‘र्थ’ वर जोर देऊन त्याने पूजेची सांगता केली. पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून नमस्कार केला. आसनाची घडी करून शेल्फमध्ये ठेवली आणि कपडे बदलायला आतल्या खोलीत ‘झाली बाबा एकदाची देवपूजा’ असे पुटपुटत गेला. दोन्ही मुलं अजून सोफ्यावर लोळत पडलेली. दोघांना यथेच्छ शिवीगाळ करून झाल्यावर त्याचा मोर्चा पत्नीकडे वळला. तिथे अजून अर्धवट तयारी झालेली दिसल्यावर उरलेली शिवीगाळ तिथे झाली. मुलांनी त्रासिक चेहर्याने ऐकून घेतले होते पण पत्नीने प्रतिवार केले आणि मघाशी चकाचक केलेल्या देवमूर्तीपुढे छानशी शाब्दिक चकमक उडाली. हे सारे नित्य असते. घरातल्या सदस्यांनाच काय देवालाही ह्याची सवय झाली असणार. देवासमोर गंभीर…
पुढे वाचाचौथं पोट – ह. मो. मराठे
राजकारण म्हणजे पैसे खाण्याचा धंदाच झालाय. भारतीय राज्यव्यवस्थेत तर राजकारणाइतके बदनाम दुसरे कुठलेही क्षेत्र नाही. महाराष्ट्रातील विख्यात लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांनी एका व्यंगकथेच्या माध्यमातून समकालीन राजकीय व्यवस्थेवर केलेले भाष्य – विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना…
पुढे वाचा