लोकोत्सव व्हावा विधायकसेना – देवदत्त बेळगावकर
वेदांपासून ते अगदी आजच्या काळापर्यंत पूजला जाणारा देव म्हणजे गणपती होय. ऋग्वेदातील एक ऋचा आहे त्याला गणपती सुक्त असे म्हणतात. पुराण काळात तर गणपतीच्या अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. आज गणपती केवळ देवळात पुजला जातो असे नाही तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात बसवलेल्या मूर्तीलाही मंदिरातल्या गणपतीइतकेच महत्त्व दिले जाते. भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला जितके महत्त्व आहे तसेच महत्त्व आता माघ महिन्यात गणेश जन्माच्या निमित्ताने होणाऱ्या उत्सवालाही येऊ लागले आहे. गणरायाचा हा उत्सव आता दिवाळीपेक्षा देखील मोठा होईल का काय? असे रूप या उत्सवास प्राप्त झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर…
पुढे वाचामाझा गणेश – जयेंद्र साळगांवकर
माझा जन्मच मालवणचा! माझे वडील स्व. जयंतराव साळगांवकर हे लहानाचे मोठे मालवणमध्येच झाले. पुढे ते नोकरीकरिता मुंबईला आले आणि येथेच स्थायिकही झाले. तरी दरवर्षी गणेश चतुर्थीला आम्ही सर्व कुटुंबीय मालवणला जाऊन घरी गणेशाची मूर्ती आणून, तिची यथासांग पूजा करून आणि पाचव्या दिवशी विसर्जन करूनच मुंबईला परतत असू. अनेक वर्षे हे सुरू होते. मुंबईला जेव्हा त्यांनी एक इमारत विकत घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या आई म्हणजे आमच्या आजी स्व. इंदिराबाई साळगांवकर यांच्याशी विचारविनिमय करून गणपती मुंबईत आणावयास सुरुवात केली. तीच प्रथा अजूनही आमच्या कुटुंबात सुरू असून आमच्या समस्त साळगांवकर कुटुंबाचा तो एकच…
पुढे वाचाया वर्षी गणेशोत्सव 11 दिवसांचा – मोहनराव दाते – पंचागकर्ते
दिनांक 7 सप्टेंबर रोजी शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1:51 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना माध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते. भारतात आणि विशेषत्वाने…
पुढे वाचा‘चपराक’चा ज्ञानमयी गणेशोत्सव – घनश्याम पाटील
सस्नेह जय गणेश! आळंदी-पंढरपूरची भक्तिमय वातावरणात अविरतपणे सुरु असलेली वारी, गणेशोत्सव आणि दिवाळी अंक या तीन परंपरा मराठी माणसाच्या अस्मितेच्या, गौरवाच्या आहेत. ‘चपराक’ मासिकाने वारीच्या निमित्ताने सातत्याने दर्जेदार साहित्य दिलेले आहेच. दिवाळी अंकाच्या परंपरेत तर ‘चपराक’चा अंक अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावर्षीपासून दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पांचा विशेषांक प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. खरेतर गणपती म्हणजे विद्येची देवता! प्रत्येक कामाची मंगलमय सुरुवात म्हणजे श्रीगणेशा!! ‘त्याच्या’ कृपेने प्रत्येक कार्य तडीस जाते, अशी आपली दृढ श्रद्धा. अनेकांनी ती अनुभूती आपापल्या पातळीवर घेतलेली असते. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळकांनी हा…
पुढे वाचासंदीप वाकचौरे यांचा शिक्षण विचार – घनश्याम पाटील
प्रस्तावना – शिक्षणाचे प्रश्नोपनिषद संदीप वाकचौरे यांचा शिक्षण विचार आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, मेंदूही आहे. या सगळ्याचा सगळे जण वापर करतातच असे मात्र मुळीच नाही. महात्मा गांधींची तीन माकडं आपणास माहीत आहेतच. वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका असं त्यांनी सांगितलं. त्याचा सोयीस्कर अर्थ अनेकांनी घेतला. परिणामी समाजात कितीही, कसलेही अराजक माजले तरी असे महाभाग वाईट वृत्तीच्या विरूद्ध काही बोलत नाहीत, सामान्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत नाहीत, दुष्ट शक्तींचा विरोध करण्यास धजावत नाहीत. अशावेळी आपले डोळे, कान, नाक आणि मेंदू सजग ठेवून कोणी…
पुढे वाचागणेशोत्सव विशेषांक : गणेशभक्तांच्या भेटीसाठी सज्ज!
या अंकात काय वाचाल? चपराक’चा ज्ञानमयी गणेशोत्सव – संपादकीय – घनश्याम पाटील या वर्षी गणेशोत्सव अकरा दिवसांचा – मोहनराव दाते माझा गणेश – जयेंद्र साळगांवकर लोकोत्सव व्हावा विधायक सेना – देवदत्त बेळगांवकर दीडशे वर्षे जुने हस्तलिखित ‘गकारदि गणपति सहस्त्रनाम’ – प्रा. बाळकृष्ण लळीत गणेशोत्सव काल आणि आज – अंकुश काकडे श्री गणेशाचे आठ अवतार – रवींद्र धोंगडे निसर्गाशी नाते सांगणारा कोकणचा घरगुती गणेशोत्सव – सतीश लळीत संत साहित्यातील गणपती – संदीप वाकचौरे लोकमानसातून हरवलेला गणेश भेटला – संजय सोनवणी मी, गणपती आणि बरंच काही – डॉ. सुहास नेने अष्टविनायक –…
पुढे वाचाबहुआयामी आचार्य अत्रे – अरुण कमळापूरकर
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे शब्द जरी उच्चारले तरी माझ्या पिढीच्या म्हणजे पन्नासच्या दशकात जन्मलेल्या आणि त्याच्या आधीच्याही पिढ्यांच्या डोळ्यापुढे एक भारदस्त, धिप्पाड व्यक्तिमत्त्व उभे राहते. येत्या 13 ऑगस्टला आचार्यांच्या जन्माला 126 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या निर्वाणालाही 55 वर्षे होऊन गेली तरीही मराठी मनातली त्यांची प्रतिमा जराही धूसर झालेली नाही. त्यांच्या आयुष्यातील लहानमोठ्या घटना, जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांची उत्तुंग कर्तबगारी उभ्या महाराष्ट्राला उत्तमपणे ज्ञात आहेच. त्यामुळे जयंतीनिमित्ताने नव्याने काय लिहावे हा प्रश्नच आहे; पण तरीही याप्रसंगी त्यांची आठवण जागी न करण्याचा करंटेपणा करणे केवळ अशक्य.
पुढे वाचासैनिक हो तुमच्यासाठी! – राजेंद्र ल. हुंजे
आपल्या देशाची सीमा अहोरात्र पहारा देत उभ्या असलेल्या जवानांमुळे अत्यंत सुरक्षित आहे. या जवानांनी कधीही आपल्या जिवाची तमा बाळगली नाही, ना कधी मनात आपल्या कुटुंबीयांबद्दल आलेला विचार कवटाळला. व्रत एकच देशसेवेचं, निर्धार एकच शत्रूला जागेवर गारद करण्याचा. सीमा सुरक्षा दलाच्या अशा अनेक जवानांवर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे प्रेम करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा एखादाच अवलिया असतो, जो त्याच्या सुट्टीच्या दिवशीही फक्त जवानांच्या आरोग्याचीच काळजी करत असतो. हो, असाच एक अवलिया सेवाभावी डॉक्टर आहे, अहमदाबादमधील डॉ. प्रकाश कुरमी.
पुढे वाचाशब्दांजली – डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर
डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर हे सामाजिक भान असलेले वैद्यकीय अधिकारी आणि विचारवंत होते. त्यांचे ‘ओड आणि ओढ’ हे आत्मचरित्र या महिन्यात 31 तारखेला ‘चपराक प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यांचे नुकतेच म्हणजे 25/06/2024रोजी निधन झाले. त्यांना ‘चपराक’तर्फे श्रद्धांजली म्हणून हा विशेष विभाग देत आहोत. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या वेबसाईटवरून घरपोहोच मागवू शकाल. शिवाय 31 ऑगस्टनंतर याचे ऑडिओ बुकही आपण ‘चपराक’च्या युट्यूब चॅनेलवरून ऐकू शकाल. – संपादक
पुढे वाचा