पुस्तकाबद्दल ‘भारत-आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष’ हा एक ज्ञानपट आहे. यात वेळोवेळी भारतावर झालेली आक्रमणे, नकाशा यासह माहिती आहे. त्याचबरोबर त्या आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलेे संघर्ष व त्यांना मिळालेले विजय नकाशे व माहितीच्या टिपणासह दाखविलेले आहेत. असे स्वातंत्र्यसंघर्ष प्राचीन काळी चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, पुष्यमित्र, गौतमीपुत्र सातकर्णी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, यशोधर्मन यांनी यवन, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाविरूद्ध केले. मध्य काळात बप्पा रावळ, धंग चंदेल, हरीहर बुक्का, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह यांनी तुर्क व मुघलाविरुद्ध स्वातंत्र्यसंघर्ष केले. अर्वाचीन काळी महादजी शिंदे, इब्राहीम गार्दी, हैदरअली, रण्जितसिंह, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी…
पुढे वाचाTag: chaprak prakashan
शिवप्रताप
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित कादंबरीचे हे एक प्रकरण. ‘चपराक प्रकाशन’ची सर्वोत्कृष्ट निर्मिती असलेल्या या शिवदिग्वीजयाच्या रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कादंबरीची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवराज्याभिषेकदिनानिमित्त हे प्रकरण जरूर वाचा. आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
पुढे वाचाआयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण!
नुकताच सुधाकर कवडे लिखित ‘आयपांढरीतली माणसं’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह वाचण्यात आला. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी अत्यंत लक्षवेधक असे चितारले आहे. प्राचार्य शिवाजीराव बागल यांनी ‘आयपांढरीतल्या माणसांचा’ कानोसा घेताना, ग्रंथाची पाठराखण करताना ओळख करुन दिली आहे. मलपृष्ठावर ख्यातकीर्त साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी शुभेच्छारुपी निवेदन केलेले आहे.
पुढे वाचाभूमी, निसर्ग आणि नात्यांच्या ताटातुटीचे वर्तमान आगंतुकाची स्वगते
अभिव्यक्ती प्रामाणिक असली की थेट हृदयाच्या गाभ्यातून कविता जन्माला येते. मातीच्या मुळापर्यंत गेलं की जोमानं पीक तरारून येतं, हीच गोष्ट कवितेबाबतची. सभोवतालचा अस्वस्थ करणारा काळ मोठा विचित्र आहे. अशावेळी कवीची होणारी अस्वस्थ घालमेल म्हणजे कवितेपूर्वीची स्वतःची सोलुन निघण्याची जणू एक प्रक्रियाच असते. त्यातुन येणारी अस्सल कविता म्हणजे स्वतःला चिंतनातून व्यक्त करणारी एक साधनाच असते.
पुढे वाचामहाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग!
माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहाने वाचले. एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा ते वाचल्यावरच माझे समाधान झाले. रमेश वाघ हे स्वत: उत्तम कीर्तनकार तर आहेतच…
पुढे वाचाजगबुडी माया
सुमारे १३०० वर्षांपूर्वी संशोधकांना मेस्किकोमधील काबा शहरामध्ये एक प्रचंड चक्राकार खोदकाम केलेली एक शिळा सापडली. ही शिळा कोणी तयार केली याचा संशोधकांनी तेव्हापासून आत्तापर्यंत शोध घेतला पण काहीही हाती लागले नाही. बहुदा स्पॅनिश समुद्रडाकूंनी त्याच्यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केले व त्याची सर्व संपत्ती खरवल्यासारखी लुटून नेली.
पुढे वाचासमईच्या शुभ्रकळ्या
सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
पुढे वाचाबळी तो…
आता जमाना बदलला आहे. सगळ्या व्याख्याच बदलायला लागल्या आहेत, म्हणी उलट्या पालट्या व्हायला लागल्या आहेत. त्यांचे अर्थच बदलायला लागले आहेत. सगळ्या क्षेत्रात आनंदी आनंद आहे. कुठल्याही व्यवस्थापनात जा एका चकरेत काम होणारच नाही आणि एका चकरेत झालेच तर आपणच चक्कर येऊन पडू, असं कसं झालं म्हणून. एखादा माणूस गोड बोलला तरी भीती वाटते, हा का बुवा गोड बोलला? काय असेल याच्या मनात? एखाद्याने आपले काम ताबडतोब केलं तरी मनात शंका निर्माण होते, ‘ह्याचा काय फायदा असेल बरं आपल्याकडून, म्हणून एवढ्या तातडीने आपले काम केले याने? कुणालाही बोलवा, ‘आलोच लगेच’ म्हणतो…
पुढे वाचानिवडणुकीतली बाई
डॉ. वृषाली किन्हाळकर, नांदेड भारतातली बाई तशी नशीबवान आहे एका बाबतीत! मतदानाच्या हक्कासाठी तिला संघर्ष करावा लागला नाही! पण खरंच या गोष्टीचं काहीतरी मूल्य तिच्या मनात आहे का? मतदानाचा हक्क तिला आपसुकपणेच लाभलेला आहे पण मतदानाचा अर्थ प्रत्येक भारतीय बाईला कळलाय का? नवर्याच्या राजकारणामुळे माझा निवडणुकांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. गेल्या 25 वर्षांत सुमारे सहा सलग विधानसभा निवडणुका लढण्याच्या माझ्या नवर्याच्या अनुभवामुळे मला जे काही चित्र दिसलं, ते एक भारतीय माणूस म्हणून मी नोंदवून ठेवतेय माझ्या मनात.
पुढे वाचाविचारांचा दरवळ
– संजीवनी घळसासी पत्रकार, लेखक, प्रकाशक, संपादक अशा अनेक जबाबदार्या एका विशिष्ठ ध्येयाने, निष्ठेने, पूर्ण क्षमतेने, उत्साहाने व आनंदाने पार पाडणारे ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक वाचले. हे पुस्तक त्यांच्या अनेक पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. हे पुस्तक अनेक विषयांना स्पर्श करते व त्यातुन लेखकाचा आदर्शवाद अधोरेखित करते.
पुढे वाचा