स्वप्नविक्या

सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत  तो गावात आला. लोकांना वाटलं की  ‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच.  लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय?  लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते. 

पुढे वाचा

बाभूळकांड

बाभूळकांड

ऐश्‍वर्य पाटेकर युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाशिक. 9822295672 मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2019 वारदात घडली तेव्हा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. भरदिवसा, भरगल्लीत बाभूळकांड घडवलं जातं अन् एकही साक्षीदार नाही! असं कसं होऊ शकतं? एकमात्र आहे की, माणसांचं जग सोयीनं आंधळं, मुकं, बहिरं होऊ शकतं याचा हा ढळढळीत पुरावा म्हणून आपण या घटनेकडं पाहू शकतो. होरपळून मेलेले पक्षी, त्यांच्या चोचीतून उठणारे अतीव वेदनेचे अंतिम चित्कार कुणीच ऐकले नाहीत! अग्नीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या असतील, त्याही कुणी पाहू नये! ही न पटण्यासारखी सबब. शेवटी पक्ष्यांचं जग माणसांच्या दृष्टिनं अतिशय क्षुल्लक!…

पुढे वाचा