देखणी

माखी नाव तिचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली एका झोपडपट्टीत ती, तिच्या तीन बहिणी, आई व सदा न कदा दारुच्या नशेत धुंद राहणारा तिचा बाप एवढे कुटुंब एकाच खोलीत, खोली म्हणण्यापेक्षा झोपडी काट्याकुट्या, रबर, कागद, गोणपाटाने तयार झालेली झोपडी अशा ठिकाणी जन्म घेतला.

पुढे वाचा

पेच – कथा

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवी, लेखक बंडा जोशी यांची ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकातील ही कथा अवश्य वाचा.

पुढे वाचा

चित्र्या

‘‘आज्जे हे बग, चित्र्या वस्तीवरनं हिथं घरात आलाय बग!’’ नातवाच्या हाकाटीने कावरीबावरी झालेली मथुराबाई आपल्या जीर्ण झालेल्या इरकली नऊवारीचा पदर नीटनेटकाच असूनही पुन्हा ठीकठाक करत उजव्या हातानं कपाळावर ओढत ओसरीत आली. जणू काही कुणी जीवाभावाचं माणूस घरी आलंय आणि त्याच्या समोर अदबीनं जावं तशी मथुराबाई लगबगीनं बाहेर आली होती. मथुरा दारापाशी येताच चित्र्यानं तिचे हात चाटायला सुरूवात केली तशी मथुराआजीच्या डोळ्याला धार लागली. पदराचं टोक डोळ्याला पुसत ती झपकन आत गेली. त्या बरोबर चित्र्याही आत आला. मथुराआजीनं ढेलजेत बसकन मारली आणि डोळ्याला लागलेली धार पुसू लागली. ते बघून चित्र्या तिच्या…

पुढे वाचा

स्वप्नविक्या

सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत  तो गावात आला. लोकांना वाटलं की  ‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच.  लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय?  लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते. 

पुढे वाचा

निर्वाण

निर्वाण

कथाकार गदिमांचा इतका सुंदर परिचय दिनकर जोशी यांनी करून दिल्यानंतर खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी गदिमांची एक कथा पुनर्प्रकाशित करीत आहोत. मूळ कथा असल्याने यातील भाषा आणि व्याकरण अर्थातच त्यांच्या त्यावेळच्या कथेतल्याप्रमाणे आहे. आजच्या कट्टरतावादाच्या काळात ही कथा वाचकांना एक वेगळा विचार देऊन जाईल. – संपादक

पुढे वाचा

अपराध

अपराध

कमल आणि विभावरी दोघी सख्या बहिणी. कमल मोठी, फारशी शिकली नाही. कॉलेजला शिकायला गेली आणि एका माणसाच्या प्रेमात पडली. विभावरी खूप हुशार. अभ्यासात, खेळात, दिसायलाही खूप सुंदर. देवाने सारं उजवं माप विभाला दिलेलं. तिचं सतत कौतुक व्हायचं. कमल मात्र अगदीच कपाळ करंटी. ऐन शिकायच्या वयात प्रेमात पडली. ज्या माणसाच्या प्रेमात पडली तो साधा मेकॅनिक.

पुढे वाचा