दरवळ वाचकांना सुगंधित करणारा

दरवळ वाचकांना सुगंधित करणारा

‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांच्या ‘दरवळ’ या नव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी प्रस्तावना लिहिलीय. ही मर्मग्रही प्रस्तावना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.

पुढे वाचा

बाभूळकांड

बाभूळकांड

ऐश्‍वर्य पाटेकर युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाशिक. 9822295672 मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2019 वारदात घडली तेव्हा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. भरदिवसा, भरगल्लीत बाभूळकांड घडवलं जातं अन् एकही साक्षीदार नाही! असं कसं होऊ शकतं? एकमात्र आहे की, माणसांचं जग सोयीनं आंधळं, मुकं, बहिरं होऊ शकतं याचा हा ढळढळीत पुरावा म्हणून आपण या घटनेकडं पाहू शकतो. होरपळून मेलेले पक्षी, त्यांच्या चोचीतून उठणारे अतीव वेदनेचे अंतिम चित्कार कुणीच ऐकले नाहीत! अग्नीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या असतील, त्याही कुणी पाहू नये! ही न पटण्यासारखी सबब. शेवटी पक्ष्यांचं जग माणसांच्या दृष्टिनं अतिशय क्षुल्लक!…

पुढे वाचा

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

मासिक साहित्य चपराक, दिवाळी 2019 भारतीय भक्ती संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे आहे. पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाला दैवत मानणार्‍या वारकरी संप्रदायास संत ज्ञानोबा माऊली व संत नामदेवरायांनी लोकप्रियता मिळवून दिली. संत ज्ञानेश्वरांपूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात असला तरी त्यांनी आपल्या ग्रंथातून व कार्यातून वारकरी संप्रदायास मूर्त रूप दिले आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी विश्वात्मक शिकवण ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहे. सामाजिक समतेचा व वारकरी संप्रदायाच्या भक्तिमंदिराचा पाया घालणार्‍या संत ज्ञानेश्वरांचे अभंग, ओवी, गवळण, विरहिणी, भारूड यामधून त्यांचे विश्वात्मक अंतःकरण प्रतीत होते.

पुढे वाचा

जाज्ज्वल्य देशभक्तीचे पाईक मोहन रानडे

जाज्ज्वल्य देशभक्तीचे पाईक मोहन रानडे

चपराक दिवाळी अंक 2019 आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक रणसंग्राम झाले. निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या. सत्याग्रह झाले. अनेक लढवय्ये क्रांतिकारक हसत-हसत फासावर गेले; तसेच अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिवकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक महापुरूषांनी कठोर कारावास भोगला. हालअपेष्टा सहन केल्या.

पुढे वाचा

संतसाहित्य आणि युवाविश्व 

संतसाहित्य आणि युवाविश्व 

मासिक ‘साहित्य चपराक’ डिसेंबर 2019 संतसाहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असेच चित्र तरुण पिढीच्या मनात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या सर्व नव्या संकल्पना संतसाहित्यात सापडतात. इमोशनल इंटलिजन्सपासून ते इकोफ्रेंडली घरापर्यंत, सकारात्मक दृष्टिकोनापासून ते करिअर निवडीपर्यंत, जलसंधारणापासून ते व्यवस्थापनापर्यंत मानवी जीवनाला उपयुक्त ठरणार्‍या सर्व गोष्टी संतसाहित्यात आहेत. गरज आहे ती संतसाहित्य तरुण वयातच वाचण्याची.

पुढे वाचा

मराठीच्या पहिल्या लेखकाची गोष्ट

मराठीच्या पहिल्या लेखकाची गोष्ट

चपराक दिवाळी विशेषांक 2019 ‘‘मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?’’ काही वेळेस या प्रश्‍नाचे उत्तर ‘ज्योतिष रत्नमाला’, ‘विवेकसिंधु’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘लीळाचरित्र’, ‘धवळे’ असे मिळते. ‘‘मराठीतील पहिला ग्रंथ ‘लीळाचरित्र’चे लेखक कोण होते?’’ या प्रश्‍नाचे उत्तर ‘म्हाइंभट’ असे चटकन मिळते. ‘‘त्यांचे गाव कुठले?’’ या प्रश्‍नाचेही उत्तर ‘सराळे’ असे लगेच मिळते! पण ‘‘हे गाव कुठे आहे?’’ या प्रश्‍नाचे उत्तर बर्‍याचवेळा मिळत नाही. अगदी आंतरजालवर शोधले तरी या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही. अशावेळी दुसरा एक प्रश्‍न विचारून पहा. ‘‘शेक्सपियर यांचा जन्म कुठला?’’

पुढे वाचा

प्राक्तन – प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

प्राक्तन - प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 बहारो फुल बरसाओ, मेरा महेबूब आया है… हे गाणं मंडपात वाजायला लागलं आणि सार्‍यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडं वळल्या. अंगावर लाल रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचं नऊवारी भरजरी वस्त्र ल्यालेली नववधू मोठ्या डौलदार चालिनं एक एक पाऊल टाकत मंडपात प्रवेशकर्ती झाली. तिच्या खांद्यावर आपले हात ठेवत तिचा भावी पती आश्वस्त होत संयमानं तिच्या चालीशी स्वतःची चाल जुळवत तिच्या मागून चालत होता.

पुढे वाचा

आचार्य अत्रे यांचा शक्तिमान विनोद

आचार्य अत्रे यांचा शक्तिमान विनोद

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. त्यांना ‘विनोदपीठाचे तिसरे शंकराचार्य’ म्हटले गेले असले तरी कोल्हटकर, गडकरी यांच्या विनोदाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. पूर्वसुरींचे ऋण त्यांनी घेतले होते, जरूर घेतले होते! पण ते त्या छायेत कायम राहिले नाहीत. याचे उत्तर अत्रे यांनीच दिले आहे. ते स्वतःला ‘जीवनाचा यात्रेकरू’ म्हणत असत. ही त्यांची यात्रा जशी आयुष्यभर संपन्न झाली तशी या दोघांना करता आलेली नाही. याचे कारण होते प्रकृतीभिन्नता.

पुढे वाचा

धोक्याच्या वळणावर लातूर पॅटर्न

धोक्याच्या वळणावर लातूर पॅटर्न

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 दहावी व बारावीच्या निकालासोबतच नीट, सीईटी परीक्षांच्या धर्तीवर राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चर्चिले जाणारे लातूर काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीमुळे चर्चेत आले आहे. शेतरानात ऊस, सोयाबीन, तूर आणि गावात शिक्षण व शिकवण्या वगळता इथे कोणतेही पीक पिकत नाही. सततचा दुष्काळ व पाणीटंचाई, अवर्षणप्रवण परिस्थिती, नेहमीचीच गारपीट व दळणवळणाच्या सुविधांअभावी इथे उद्योग व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे साखर कारखानदारी, डाळ व तेलबिया प्रक्रिया उद्योगावरच अर्थकारण अवलंबून होते. त्यात साधारणत: चार दशकांपूर्वी शैक्षणिक पॅटर्नची व एक दशकापूर्वी खाजगी क्लासेसचा पॅटर्न निर्माण झाला. तो रुजला व अल्पावधित ‘हा…

पुढे वाचा

सावरकर समजून घ्या…!

सावरकर समजून घ्या...!

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 16 जून 2019 रोजी स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या 31 व्या अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलनात राष्ट्रीय निरूपणकार आणि वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केलेल्या भाषणाचा हा सारांश खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी . आलेल्या सर्व सावरकर प्रेमींचे मी मनापासून स्वागत करतो. काल एक परिचित भेटले. ‘‘सावरकर संमेलन हे गांधी सभागृहात असणे हे वेगळेपण आहे ना?’’ असे सहज म्हणाले.

पुढे वाचा