आजि नवस हे फळले नवसी

Dr. Pooja Bhavarth Dekhne

प्रत्येक वयात आलेल्या मुलीच्या आई-वडिलांना चिंता लागते ते तिला सुयोग्य असं स्थळ व वर मिळण्याची. अर्थात माझ्याही आई-बाबांना हीच चिंता लागलेली होती. मी दत्त सांप्रदायिक प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अनुग्रहित. माझे आजोबा नानांचे अधिकारी शिष्य. माझ्या आजोळी आमचे वंशपरंपरागत आलेले पेशवेकालीन राम मंदिर आणि नानांनी स्थापन केलेले दत्त मंदिर. वडिलांकडून प. पू. गोंदवलेकर महाराजांची उपासना. त्यामुळे लहानपणापासून संपूर्ण आयुष्य हे आध्यात्मिक उत्सवांमध्येच गेलेले. भजनाची नितांत आवड. आमच्या नानांच्या परिवारात तर मला ‘मीराबाई’ म्हणून संबोधत असत. त्यामुळे जशी मी मोठी झाले तशी साहजिकच प्रत्येकाच्या तोंडी हीच चर्चा असे, की…

पुढे वाचा

चिरंतनाची ओढ असणारा कवी

चिरंतनाची ओढ असणारा कवी

स्वतःला प्रतिभासंपन्न म्हणवून घेणार्‍या काही कवींचे कवितेशी असलेले नाते फक्त शब्दांपुरतेच असते पण ज्यांच्या धमन्याधमन्यातून फक्त कविता आणि कविताच वाहत होती असे अपवाद्भूत कवी म्हणून सुधीर मोघे यांचा उल्लेख करावा लागेल. मोघे कवितेत रमले पण इतर प्रांतातही त्यांची मुशाफिरी चालूच राहिली. कवितेबरोबरच पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, निवेदन या क्षेत्रांमध्येही ते लीलया वावरले.

पुढे वाचा

कल्पतरू आण्णा

कल्पतरू आण्णा

मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात बसलो होतो. पीएच.डी. प्रबंधलेखनाचे काम दररोज नित्यनेमाने करत होतो. त्याकरिता लागणारे संदर्भ गोळा करून ते वाचून काढत होतो. त्यांचा आधार घेत-घेत प्रबंधलेखनाला गती देत होतो. त्या दिवशी सकाळी सहा वाजता उठून ठीक सात वाजता जयकर ग्रंथालयाच्या वाचनकक्षासमोर रांगेत उभा राहिलो. ग्रंथालयाचा वाचनकक्ष उघडण्यापूर्वी रांगेत उभे राहणे, क्रमाक्रमाने आपली नोंद करून वाचन कक्षात प्रवेश करणे, आपली जागा पकडणे व तेथे दिवसभर लेखन-वाचन करणे हा माझा नित्य परिपाठ झाला होता.

पुढे वाचा

आर्थिक साक्षरता

आर्थिक साक्षरता

उत्पन्नाचे दोन प्रकार असतात. हे उत्पन्न वापरायचे काही निकष आहेत. पैसे हाताळण्याच्या पण पद्धती आहेत. जो माणूस पैशाकरता काम करत असताना, हळूहळू त्यालाच आपला गुलाम बनवायला शिकतो, कालांतराने त्याच्या जीवनात अशी वेळ येते की, आता त्याच्याकरता फक्त पैसाच काम करुन दर महिन्याला त्याला उत्पन्न आणून देतो. तो स्वतः आता पैशाकरता काम करायचं बंद करतो. आपले आयुष्य मस्त जगत राहतो. असा माणूस पूर्णपणे आर्थिक साक्षर झाला असे समजण्यास हरकत नाही. चला मग आता आर्थिक साक्षर होण्यासाठी कसे वागायचे किंवा कसे वागायचे नाही ते पाहूया.

पुढे वाचा

गदिमांच्या कथा

गदिमांच्या कथा

मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी झाली. फारसे कार्यक्रम झाले नाहीत. ‘नाव गदिमांचे आणि कार्यक्रम स्वतःचे’ असे काही झाले. मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्या साहित्यावर एक चर्चासत्र घेतले. चित्रपट व्यवसायात हयात घालविलेले माडगूळकर त्यांच्या चित्रपट गीताने ओळखले जातात. गदिमा त्यांच्या बालगीतांनी, चित्रपटातील भावगीतांनी आणि विशेष म्हणजे गीतरामायणामुळे लोकांसमोर आहेत! पण या लेखात आपण कथाकार माडगूळकरांचा परिचय करून घेणार आहोत, जो महाराष्ट्राला फारच कमी आहे.

पुढे वाचा

म्हाळसा कुठे गेली?

म्हाळसा कुठे गेली?

चपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची उत्तमोत्तम पुस्तके मागविण्यासाठी व्हाटस् अ‍ॅप क्रमांक – 7057292092 म्हाळसा कुठे गेली? असा काही प्रश्न होऊ शकतो का? मला वाटते असाही प्रश्न होऊ शकतो. या प्रश्नाची उत्तरे अनेक मिळू शकतात. उदाहरणार्थ, ‘जय मल्हार मालिका संपली. त्यामुळे म्हाळसा आता दिसत नाही’ असे एक उत्तर मिळू शकते. तसेच ‘म्हाळसा नेवाश्यातही असेल; कारण म्हाळसा ही खंडोबाची पत्नी होती.’ या म्हाळसेचे माहेर नेवासा होते. त्यामुळे म्हाळासेचे मंदिर नेवाश्यामध्ये आहे. इथे प्रश्नाचा शोध पूर्ण होतो पण हा शोध समाधान देणारा होत नाही. म्हणून पुन्हा शोध घ्यावासा वाटतो.…

पुढे वाचा

आईचं पत्र हरवलं…

आईचं पत्र हरवलं...

चपराक दिवाळी 2020 सणासुदीचे दिवस होते. वर्गातील पाच-सहा विद्यार्थी आज अनुपस्थित होते. काहीजण आईबाबांसोबत खरेदीला गेले होते. काही जवळच्या देवदेवतांच्या दर्शनासाठी गेले होते. वर्गात हजर असणार्‍या मुलांची मानसिकता आज जरा निराळीच होती! मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं! सकाळ सत्रात एक कविता शिकवून झाली होती. बर्‍याच जणांनी ती पाठही केली होती!

पुढे वाचा

व्हायरस..!!

व्हायरस..!!

शिरीष देशमुख, मंगरूळ, जि. जालना साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2020 अंक मागवण्यासाठी संपर्क – 7057292092 ‘‘हायलो…’’ आबांनी थरथरत्या हातानं मोबाईल कानाला लावला. ‘‘आबा, मी सतु बोलतोय…’’ समोरून त्यांचा मुलगा बोलत होता.

पुढे वाचा

उगवतीला सलाम!

उगवतीला सलाम!

निवडणुकीचे दिवस होते. एक उमेदवार पंधरा वीस पाठीराख्यांचं मोहोळ घेऊन वॉर्डात प्रचाराला आले. अत्यंत नम्रपणे कमरेत (त्यांच्याच) वाकून प्रत्येकाला बत्तीशी दाखवत नमस्कार करीत होते. तरुणांना मिठी मारत होते. मलाच मत द्या म्हणून लाचार आवाहनही करीत होते. माझ्या ते चांगल्या परिचयाचे होते. मी स्वागताला तयार होतो. शेजारच्या लहान मुलाला कडेवर घेऊन आपुलकी दाखवत होते पण अचानक मला न भेटताच तो लवाजमा पुढे निघून गेला.

पुढे वाचा