प्राक्तन – प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

प्राक्तन - प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 बहारो फुल बरसाओ, मेरा महेबूब आया है… हे गाणं मंडपात वाजायला लागलं आणि सार्‍यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडं वळल्या. अंगावर लाल रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचं नऊवारी भरजरी वस्त्र ल्यालेली नववधू मोठ्या डौलदार चालिनं एक एक पाऊल टाकत मंडपात प्रवेशकर्ती झाली. तिच्या खांद्यावर आपले हात ठेवत तिचा भावी पती आश्वस्त होत संयमानं तिच्या चालीशी स्वतःची चाल जुळवत तिच्या मागून चालत होता.

पुढे वाचा

पू. साने गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्री विषयक दृष्टिकोन

पांडुरंग सदाशिव साने अर्थात पू. साने गुरुजी यांची विपुल साहित्य संपदा आहे. अभ्यासू आणि ज्ञानपिपासू गुरुजींना अध्यापन, पत्रकारिता, समाजकारण आणि राजकारणाचा मोठा व्यासंग. अनुभवांच्या कसोटीवर खरे उतरलेले आणि हृदयाच्या आतून आलेले असल्याने त्यांच्या साहित्याला वैचारिक अनुष्ठान होते. सततच्या सूक्ष्म अशा चिंतनातून आल्यामुळे त्याला वेगळी जीवनदृष्टी आहे. त्यांच्या लेखनाला मराठी वाङ्मयात स्वतंत्र स्थान आहे. त्यांनी 19 कादंबर्‍या, 15 कथासंग्रह, 16 कथा वाङ्मय, 2 कवितासंग्रह, 12 निबंध, 20 चरित्र, 14 अनुवादीत, 2 संकलन आणि अप्रकाशित बरचसं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. या सार्‍यांचे स्वतंत्र चिंतन समीक्षणही झालेलं आहे. प्रस्तुत लेखात गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा…

पुढे वाचा