– डॉ. रामचंद्र देखणे 9503263046 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 आपल्या भूतकाळात जरा अंतर्मुख होऊन डोकावले की घडलेल्या प्रसंगांमधून आपल्याच जीवनातील एका जाणिवेची सृजनता सहजपणे उभी राहात असल्याचे जाणवते. त्यातील काही प्रसंग हे प्रेरणा देणारे असतात, काही स्वाभिमान जागवणारे, काही आवेश आणि उत्साह निर्माण करणारे, काही दिशादर्शी, काही कृतज्ञतेचे पथदर्शी, शांती, सुचित्व, आर्जव, स्थैर्य आणि अनहंकाराचे अनुदर्शन घडविणारे तर काही अहंकार जागविणारे, आत्मविश्वास गमावणारे, भविष्याच्या अंधार्या वाटेवर चाचपडायला लावणारे तर काही वैफल्य आणि उदासीनतेच्या गर्द छायेत लोटणारे! खरोखरीच जीवन म्हणजे अशा भिन्नभावदर्शी अनेकविध घटना आणि प्रसंगांचे एक संमेलनच असते. अशाच…
पुढे वाचाTag: sant sahitya
महाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग!
माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहाने वाचले. एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा ते वाचल्यावरच माझे समाधान झाले. रमेश वाघ हे स्वत: उत्तम कीर्तनकार तर आहेतच…
पुढे वाचासंतसाहित्य आणि युवाविश्व
मासिक ‘साहित्य चपराक’ डिसेंबर 2019 संतसाहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असेच चित्र तरुण पिढीच्या मनात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या सर्व नव्या संकल्पना संतसाहित्यात सापडतात. इमोशनल इंटलिजन्सपासून ते इकोफ्रेंडली घरापर्यंत, सकारात्मक दृष्टिकोनापासून ते करिअर निवडीपर्यंत, जलसंधारणापासून ते व्यवस्थापनापर्यंत मानवी जीवनाला उपयुक्त ठरणार्या सर्व गोष्टी संतसाहित्यात आहेत. गरज आहे ती संतसाहित्य तरुण वयातच वाचण्याची.
पुढे वाचा