– जयेंद्र साळगावकर, मुंबई 9819303889 मराठीत लोकप्रिय झालेल्या टोपीवाल्याच्या गोष्टीतील टोपीवाल्याचा मुलगा टोपी विकण्याचा व्यवसाय करू लागतो. एका झाडाखाली तो विश्रांतीला बसतो व त्याचा डोळा लागतो. झाडावरुन माकडं खाली उतरतात आणि टोपीवाल्याच्या पेटीतील टोप्या पटापट घेऊन झाडावर जाऊन बसतात. टोपीवाला जागा होतो. त्याला आपल्या वडिलांच्या कथेतील प्रसंग आठवतो व तो आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो! पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसोबत फसलो, आता नाही फसणार!’’ अशी एका कीर्तनकाराने सांगितलेली आधुनिक टोपीवाल्याची गोष्ट ऐकण्यात आली. त्यांनी तरुणांना संदेश देण्यासाठी या गोष्टीचा पुढे कीर्तनात…
पुढे वाचाTag: chaprak diwali
श्रीमंत योगी
उमेश सणस शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक 9822639110 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचित घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडं घडला.
पुढे वाचाम्हाळसा कुठे गेली?
चपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची उत्तमोत्तम पुस्तके मागविण्यासाठी व्हाटस् अॅप क्रमांक – 7057292092 म्हाळसा कुठे गेली? असा काही प्रश्न होऊ शकतो का? मला वाटते असाही प्रश्न होऊ शकतो. या प्रश्नाची उत्तरे अनेक मिळू शकतात. उदाहरणार्थ, ‘जय मल्हार मालिका संपली. त्यामुळे म्हाळसा आता दिसत नाही’ असे एक उत्तर मिळू शकते. तसेच ‘म्हाळसा नेवाश्यातही असेल; कारण म्हाळसा ही खंडोबाची पत्नी होती.’ या म्हाळसेचे माहेर नेवासा होते. त्यामुळे म्हाळासेचे मंदिर नेवाश्यामध्ये आहे. इथे प्रश्नाचा शोध पूर्ण होतो पण हा शोध समाधान देणारा होत नाही. म्हणून पुन्हा शोध घ्यावासा वाटतो.…
पुढे वाचाकुरुक्षेत्र
चपराक दिवाळी अंक 2020 अॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.
पुढे वाचाप्रहराचे ओझे सांभाळताना
चपराक दिवाळी 2020 हा अंक मागविण्यासाठी आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 ती होती म्हणून मी आहे. हे मला माहिती आहे पण ती जी होती ती नेमकी कोण होती, कशी होती हे मात्र मला माहीत नाही. ती जी अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अगदी शंभरावी सुद्धा कोणालाच ओळखत नाही मी! पण खरंच ती होती आणि मी आज आहे. तिच्याच चिवट धाग्याला पकडून माझ्यातून उद्या पुन्हा ती असणारच आहे. उद्याची तीही कदाचित अशीच लिहिणार आहे. विचार करणार आहे.
पुढे वाचाआईचं पत्र हरवलं…
चपराक दिवाळी 2020 सणासुदीचे दिवस होते. वर्गातील पाच-सहा विद्यार्थी आज अनुपस्थित होते. काहीजण आईबाबांसोबत खरेदीला गेले होते. काही जवळच्या देवदेवतांच्या दर्शनासाठी गेले होते. वर्गात हजर असणार्या मुलांची मानसिकता आज जरा निराळीच होती! मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं! सकाळ सत्रात एक कविता शिकवून झाली होती. बर्याच जणांनी ती पाठही केली होती!
पुढे वाचागुरुमंत्र
चपराक दिवाळी 2020 ‘चपराक प्रकाशन’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 एखाद्यावेळी भलताच गुरुमंत्र आपलाल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतो असं म्हणतात. मी तर गुरु करण्याच्या बाबतीत गुरुदेव दत्तांचं रेकॉर्ड मोडलं आहे. त्यांचे एकवीस गुरु होते, माझे अगणित गुरु आहेत. ज्या क्षणी आपण कुणाकडून काहीतरी शिकतो, ते त्यावेळचे गुरुवर्य!
पुढे वाचाएक सुरेल जीवनगाणे
चपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 संगीताच्या विश्वात विहार करताना लागते ताल, स्वर लयीची आस संगीत कलेची अखंड साधना करता करता घडावा सुरेल जीवनप्रवास! लहानपणापासून आत्तापर्यंत मी (डॉ.धनश्री मकरंद खरवंडीकर) या संगीत विश्वाशी कधी नकळत एकरूप झाले हे माझे मलाच कळले नाही. खरं तर माझ्या या सांगीतिक जीवनप्रवासाविषयी सांगताना खूप भरभरून बोलावेसे वाटते आहे पण यात आत्मप्रौढी मिरविण्याचा कोणताही हेतू नाही हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. माझ्या या सांगीतिक प्रवासात माझे आदरणीय गुरुजन, माझे सर्व कुटुंबीय आणि माझे सर्व हितचिंतक…
पुढे वाचासमंजस
चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्याबरोबर उसळणार्या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्या कॅनव्हासवर उतरू लागला.…
पुढे वाचाकहाणी हिंदू कोड बिलाची
साहित्य चपराक दिवाळी 2020 हा अंक मागवण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 देशाच्या सामाजिक राजकीय इतिहासात अनेक वेळा हिंदू कोड बिलाचा उल्लेख आढळतो पण अनेकांना हे हिंदू कोड बिल हे काय प्रकरण आहे हे माहिती नसतं! किंवा खूप वेळा आपल्याला त्याची अगदी एखादं दुसर्या वाक्यापुरती जुजबी माहिती असते. मीही याला अपवाद नव्हतेच; परंतु मध्यंतरी आचार्य अत्रे यांनी केलेलं एक विधान माझ्या वाचण्यात आलं.
पुढे वाचा