भाषणांची पन्नास वर्षे!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा! सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही…

पुढे वाचा

एसटीचा संप मिटला! कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय?

यंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही दोन-तीन दिवसात मिटेल असे वाटत होते, मात्र गेल्या संपात तोंडी आश्वासनं सोडली तर आपल्या हाती ठोस असं काहीच…

पुढे वाचा

करना है कुछ करके दिखाना है..

चार  किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किमी पळणे असा क्रम तुम्हाला कोणी दिला आणि कसलीही विश्रांती न घेता ठरलेल्या वेळेत हे सगळं पूर्ण करायला सांगितलं तर तुम्ही काय कराल? ‘आयर्न मॅन’ नावाची अशी एक स्पर्धा असते आणि त्यात हा विक्रम करावा लागतो. इतकं सगळं केल्यावर तुम्हाला पोलादी पुरूष म्हणून मान्यता मिळते. वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेविषयी कळल्यानंतर कठोर परिश्रम घेत एकदा नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी अशा दोन देशात झालेल्या या स्पर्धेत दोनवेळा यश मिळवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरूण गचाले! बालरोगतज्ज्ञ असलेल्या…

पुढे वाचा

सावळ्या ढगाची गुंडाळी

गेली दोन दिवस झाले सारखा पाऊस कोसळतोय. थांबायचं नाव घेत नाही. त्याचा नाद वातावरणात भरून राहिलाय. काळ्याभोर ढगांचे पुंजकेच्या पुंजके पुढे सरकत आहेत. पाऊसधारात धरित्री न्हाऊन निघत आहे. सगळंच जणू पावसानं भारून टाकलं आहे. कुणी घराच्या बाहेर पडत नाही. घराबाहेर पडून करणार काय?

पुढे वाचा

वर्डस्वर्थ, यिट्स, शेक्सपिअर आणि मी

एकेकाळी वर्डस्वर्थ, डब्ल्यू. बी. यिट्स… या दिग्गजांच्या शब्दांनी मी भारावलो होतो. त्यांच्या कवितांनी मी आणि माझी कविता अक्षरश: वेडावलो होतो. त्यांच्या इंग्रजी कवितांबरोबरच मला इंग्रजी नाटकांनीही अंतर्बाह्य बदलवलं. त्यात अर्थातच विल्यम शेक्सपिअर प्रचंड भावला. साहित्य वाचण्याची गोडी माझ्यात मातृभाषेमुळंच निर्माण झाली खरी पण साहित्यजाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि सारा दृष्टिकोन बदलण्यासाठी इंग्रजी साहित्यानं माझ्यावर गारूड केलं…

पुढे वाचा

धडपडीचे… न मावळलेले दिवस!

‘लॉकडाऊन’च्या काळात वाचनालयं बंद असली तरी घरात पुस्तकांचा खजिना अन् हाताशी भरपूर वेळ होता. पूर्वी वेगवेगळ्या वेळी वाचलेली पुस्तकं, आता सलगपणे वाचताना प्रतिभावंत लेखक-कलाकारांच्या आठवणींचे कितीतरी उभे-आडवे समान धागे मिळत गेले. ते सारे काळाच्या समान सूत्रात गुंफताना झालेल्या वस्त्रांची ही गोधडी.

पुढे वाचा

माझी आशुताई : गुणांचे अदभुत रसायन

‘चपराक’ परिवाराच्या लेखिका आशा दत्ताजी शिंदे (ज्यांना आम्ही ‘आशाई’ म्हणतो) त्यांचा आज ऐंशीवा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या भगिनी सौ. ज्ञानदा चिटणीस यांचा हा विशेष लेख. आशाईंना उत्तम आणि निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावे ही प्रार्थना. गुणांचे अदभुत रसायन माझी आशुताई !! —————————– क्रीडा साहित्य व्यवसायातील पहिली यशस्वी महाराष्ट्रीयन महिला म्हणून जिचा सर्वत्र गौरव केला जातो, ती पुण्याच्या शिंदे स्पोर्ट्स ची ” आशा शिंदे” म्हणजे आम्हा ५ प्रधान भावंडांच्या पैकी २ नंबरची बहीण,माझी आशूताई!! ताईबद्दल लिहिण्यासाठी हातात लेखणी घेतली खरी,पण तिच्याबद्दल काय आणि किती लिहावे ? हेच समजेना.इतके तिचे कार्य मोठे आहे.

पुढे वाचा

भारतीय सुपुत्र: जोगींदर सिंग

बालमित्रांनो!आपल्या देशाच्या आणि आपल्या रक्षणासाठी सीमेवर तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या एका महान सुपुत्राची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. कोण होता हा भारतमातेचा शूरवीर शिपाई ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली? प्रत्यक्ष रणांगणावर लढताना आणि समोर शत्रू यमदूताच्या रुपाने येत असताना हा वीर आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत होता, “माझ्या बहादूर शिपायांनो, युद्धाचे ढग चालून येत आहेत. शत्रू यमदुताच्या रुपाने आपल्या दिशेने येतो आहे. युद्धाला केव्हाही तोंड फुटू शकते. हिच ती वेळ आहे, आपले देशावरील प्रेम आणि निष्ठा दोन्ही पणाला लावून पराक्रम गाजवण्याची. शत्रुशी लढताना वीरमरण पत्करणे किंवा आत्ताच माघारी जाणे असे दोनच…

पुढे वाचा

एलियन

आपल्या पृथ्वी सारख्या अनेक पृथ्वी इतर आकाशगंगेमध्ये आहेत. त्यामुळे त्यावरही जीवसृष्टी असल्याचा अंदाज नेहमी व्यक्त केला जातो. इतर ग्रहांवरील सजीवांना ‘एलियन’ असं संबोधलं जातं. विदेशात त्यांना ‘यूएफओ’ अर्थात ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’ असं म्हटलं जातं. यांच्या शरीराची ठेवण व यांचा आकार वेगळ्या ढंगाचा असल्याचे बोलले जाते. एलियन पाहिल्याचा दावा अनेक जण करत असतात.

पुढे वाचा

स्वभावाचे उत्तरायण

‘एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला’, ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ ही वाक्ये आजकाल ‘बोलाची कढी बोलाचाच भात’ या वाकप्रचारात मोडत आहेत. असे असताना देखील कामापुरत्या गोडबोल्या माणसांच्या भाऊगर्दीत काही माणसं अशी असतात जी आपल्या स्वभावाच्या साखरेने आयुष्य गोड करून जातात.

पुढे वाचा