स्वतःला प्रतिभासंपन्न म्हणवून घेणार्या काही कवींचे कवितेशी असलेले नाते फक्त शब्दांपुरतेच असते पण ज्यांच्या धमन्याधमन्यातून फक्त कविता आणि कविताच वाहत होती असे अपवाद्भूत कवी म्हणून सुधीर मोघे यांचा उल्लेख करावा लागेल. मोघे कवितेत रमले पण इतर प्रांतातही त्यांची मुशाफिरी चालूच राहिली. कवितेबरोबरच पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, निवेदन या क्षेत्रांमध्येही ते लीलया वावरले.
पुढे वाचाTag: milind joshi
आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री
– प्रा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 9850270823 1890 साली महात्मा फुले कालवश झाले. एक क्रांतिसूर्य मावळला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य रूपाला आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला आणि या विचाराने आचरण करणार्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. बाबासाहेब म्हणत, ‘‘शिक्षण म्हणजे बहुजन समाज, दलित आणि स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे पहिले पाऊल आहे. समाजक्रांतीची तयारी म्हणजे शिक्षण. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठीचे हत्यार म्हणजे शिक्षण,’’ अशी बाबासाहेबांची धारणा होती.
पुढे वाचाही वाट वैखरीची
माझ्या मनात वक्तृत्वाविषयीची आवड निर्माण करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर शब्दशक्तीच्या अफाट ताकतीचा प्रत्यय मला आला. जाणत्या वयात मी त्यांच्या संपर्कात आलो. प्राचार्यांनी वक्तृत्वाची जी वाट चोखाळली, त्या वाटेने जावे असे मला वाटले. मी अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर. तसा माझा साहित्याशी संबंध नव्हता पण साहित्यप्रेमाने आणि वेडाने मला या क्षेत्रात आणले. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे व्याख्यानाच्या निमित्ताने माझी भ्रमंती महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात सुरू आहे. श्रोत्यांनी आणि संयोजकांनीच मला विषय दिले आणि मी बोलत राहिलो. व्याख्यानांच्या निमित्ताने माझी ग्रामीण भागाशी नाळ जोडली गेली. जिवाभावाची अनेक माणसे या…
पुढे वाचासंतसाहित्य आणि युवाविश्व
मासिक ‘साहित्य चपराक’ डिसेंबर 2019 संतसाहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असेच चित्र तरुण पिढीच्या मनात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या सर्व नव्या संकल्पना संतसाहित्यात सापडतात. इमोशनल इंटलिजन्सपासून ते इकोफ्रेंडली घरापर्यंत, सकारात्मक दृष्टिकोनापासून ते करिअर निवडीपर्यंत, जलसंधारणापासून ते व्यवस्थापनापर्यंत मानवी जीवनाला उपयुक्त ठरणार्या सर्व गोष्टी संतसाहित्यात आहेत. गरज आहे ती संतसाहित्य तरुण वयातच वाचण्याची.
पुढे वाचायशवंतरावांचे साहित्यिक योगदान प्रेरणादायी
‘चपराक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार गेल्या दशकात ‘चपराक’ दिवाळी महाविशेषांक हा मराठी माणसांच्या घराघरात पोहोचला आहे. जवळपास आठ राज्यातील लेखक या अंकात लेखन सहभाग देतात. साप्ताहिक, मासिक आणि ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर ‘चपराक’चे काम चालते. प्रस्थापित लेखकांबरोबरच नव्या लेखकांनाही संधी दिल्याने खास ‘चपराक’साठी लिहिणार्यांची एक स्वतंत्र फळी साहित्यक्षेत्रात निर्माण झाली आहे. येत्या आर्थिक वर्षात आम्ही 365 दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेनेही यापूर्वी त्यांच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘चपराक’ला प्रथम क्रमांक दिला आहे. आता फलटण शाखेनेही प्रथम क्रमांकाने गौरविल्याने आमचा उत्साह…
पुढे वाचा