नुकताच सुधाकर कवडे लिखित ‘आयपांढरीतली माणसं’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह वाचण्यात आला. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी अत्यंत लक्षवेधक असे चितारले आहे. प्राचार्य शिवाजीराव बागल यांनी ‘आयपांढरीतल्या माणसांचा’ कानोसा घेताना, ग्रंथाची पाठराखण करताना ओळख करुन दिली आहे. मलपृष्ठावर ख्यातकीर्त साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी शुभेच्छारुपी निवेदन केलेले आहे.
पुढे वाचाTag: nagesh shewalkar
हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!
‘‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे; तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही…’’ -स्वामी रामानंद तीर्थ)
पुढे वाचाब्रह्मचर्यावर बोलू काही!
‘एक वेळ हिमालयासारखा महापर्वत स्थानभ्रष्ट होईल, आकाश कोसळेल, अग्नी शीतल होईल, पाण्यासारखे पदार्थ स्वतःचे गुणधर्म, स्वतःची ओळख सोडतील पण हा भीष्म केलेल्या ब्रह्मचर्य या प्रतिज्ञेचा कधीही भंग होऊ देणार नाही…’ असे ठाम उद्गार आहेत पितामह भीष्माचार्य यांचे. ज्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला आणि एखादी उपासना करावी त्याप्रमाणे ते स्वतःच्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहिले म्हणूनच आज एखाद्याने कोणताही प्रण केला, प्रतिज्ञा केली की आपण त्यास भीष्मप्रतिज्ञा म्हणतो.
पुढे वाचादखलनीय ‘दखलपात्र’!
श्री घनश्याम पाटील या तरुण, तडफदार संपादकाच्या लेखणीतून उतरलेल्या निवडक अग्रलेखांचा संग्रह ‘दखलपात्र’ वाचण्यात आला. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा सारा प्रवास खरोखरच वाचनीय नि दखलनीय असाच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. त्याचबरोबर प्रथमदर्शनी असाही प्रश्न पडतो की, संपादक म्हणजे लेखनीस सर्वस्व मानणारा प्राणी असे असताना मुखपृष्ठावर लेखनीला जोडून तलवार का बरे असावी? मात्र पुस्तकाचे अंतरंग उलगडत असताना या प्रश्नाचे उत्तर आपोआप सापडते.
पुढे वाचामाझे माहेर…!
१९५६-५७ या वर्षामध्ये यवतमाळ येथे काम करीत असतानाच राम शेवाळकर यांच्या मनात नांदेडला जाण्याचा विचार घोळत होता. त्यावेळी पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्राध्यापक पदाची एक जागा रिक्त होती परंतु अचानक यवतमाळ येथील ज्या महाविद्यालयात शेवाळकर प्राचार्य म्हणून काम बघत होते त्या कॉलेजचे संस्थापक बाबाजी दाते यांचा अपघात झाला आणि शेवाळकर यांच्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी असल्यामुळे शेवाळकरांना तो विचार स्थगित ठेवावा लागला.
पुढे वाचाजिव्हायात्रा!
स्वत:च्या व्याख्यानप्रवासाला गुरुवर्य राम शेवाळकर ‘जिव्हा यात्रा’ संबोधताना म्हणत असत की वडिलांकडून मिळालेल्या सभाधीटपणा या गुणामुळे त्यांच्याच वाणीचा वारसा मी आत्मविश्वासाने चालविला. सुरुवातीला थोडा त्रास झाला; परंतु पुढेपुढे आत्मविश्वास वाढत गेला. जे जाणवले, स्फुरले, वाचले, लिहिले ते ते सारे वाणीतून मांडताना आनंद वाटत असे. हाच आनंद श्रोत्यांपर्यंत पोहचविताना माझे वक्तृत्व बहरत गेले.
पुढे वाचा