पुस्तक परिचय – भारत : पासष्ट पोलादी पाने – अर्थात आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष

पुस्तकाबद्दल ‘भारत-आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष’ हा एक ज्ञानपट आहे. यात वेळोवेळी भारतावर झालेली आक्रमणे, नकाशा यासह माहिती आहे. त्याचबरोबर त्या आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलेे संघर्ष व त्यांना मिळालेले विजय नकाशे व माहितीच्या टिपणासह दाखविलेले आहेत. असे स्वातंत्र्यसंघर्ष प्राचीन काळी चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, पुष्यमित्र, गौतमीपुत्र सातकर्णी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, यशोधर्मन यांनी यवन, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाविरूद्ध केले. मध्य काळात बप्पा रावळ, धंग चंदेल, हरीहर बुक्का, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह यांनी तुर्क व मुघलाविरुद्ध स्वातंत्र्यसंघर्ष केले. अर्वाचीन काळी महादजी शिंदे, इब्राहीम गार्दी, हैदरअली, रण्जितसिंह, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी…

पुढे वाचा

शिवशाहीर

शिवशाहीर

असं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा! असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला सांगणारे एक चांगले शिवचरित्रकार आम्हाला मिळाले, ते म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावानं विख्यात असलेल्या या शाहीरानं वयाची शंभरी गाठली आणि अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रत्येक श्वासात छत्रपती शिवाजीमहाराज होते. त्यांच्या हृदयातही महाराजच आणि महाराजांचा इतिहासच होता, याबद्दल कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही.

पुढे वाचा

पुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा

पुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा

भारताची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणेच आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत आता नव्याने तेवीस गावांचा समावेश केल्याने भौगोलिकदृष्ट्या पुणे ही सर्वात मोठी महापालिका झाली आहे. पुणे शहर कोणाचे? असा प्रश्न केला तर एकच उत्तर येते ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे. पुणे लुटून, जाळून मुरार जगदेवानं कसब्यावर गाढवाचा नांगर फिरवला, पुणं बेचिराख केलं त्या पुण्यात छत्रपती शिवरायांनी जिजाऊसाहेबांच्या समोर सोन्याचा नांगर फिरवला. तेव्हापासून पुणं हे अत्यंत सुजलाम, सुफलाम आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे.

पुढे वाचा

इतिहास जगणारा माणूस

इतिहास जगणारा माणूस

इतिहासाच्या अभ्यासामुळं माणसं वेडी होतात आणि वेडी झालेली माणसं इतिहास घडवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानं महाराष्ट्राला गेली साडेतीनशे वर्षे गारूड घातलेलं आहे आणि हा इतिहास गेली शंभर वर्षे जगणार्‍या माणसाचं नाव म्हणजे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे!

पुढे वाचा

शिवप्रताप

शिवप्रताप

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित कादंबरीचे हे एक प्रकरण. ‘चपराक प्रकाशन’ची सर्वोत्कृष्ट निर्मिती असलेल्या या शिवदिग्वीजयाच्या रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कादंबरीची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवराज्याभिषेकदिनानिमित्त हे प्रकरण जरूर वाचा. आपल्या अभिप्रायाचे स्वागत.

पुढे वाचा