उमेश सणस शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक 9822639110 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचित घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडं घडला.
पुढे वाचाTag: umesh sanas
शिवप्रताप
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित कादंबरीचे हे एक प्रकरण. ‘चपराक प्रकाशन’ची सर्वोत्कृष्ट निर्मिती असलेल्या या शिवदिग्वीजयाच्या रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कादंबरीची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवराज्याभिषेकदिनानिमित्त हे प्रकरण जरूर वाचा. आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
पुढे वाचा