बळी तो…

बळी तो...

आता जमाना बदलला आहे. सगळ्या व्याख्याच बदलायला लागल्या आहेत, म्हणी उलट्या पालट्या व्हायला लागल्या आहेत. त्यांचे अर्थच बदलायला लागले आहेत. सगळ्या क्षेत्रात आनंदी आनंद आहे. कुठल्याही व्यवस्थापनात जा एका चकरेत काम होणारच नाही आणि एका चकरेत झालेच तर आपणच चक्कर येऊन पडू, असं कसं झालं म्हणून. एखादा माणूस गोड बोलला तरी भीती वाटते, हा का बुवा गोड बोलला? काय असेल याच्या मनात? एखाद्याने आपले काम ताबडतोब केलं तरी मनात शंका निर्माण होते, ‘ह्याचा काय फायदा असेल बरं आपल्याकडून, म्हणून एवढ्या तातडीने आपले काम केले याने? कुणालाही बोलवा, ‘आलोच लगेच’ म्हणतो…

पुढे वाचा

निवडणुकीतली बाई

निवडणुकीतली बाई

डॉ. वृषाली किन्हाळकर, नांदेड भारतातली बाई तशी नशीबवान आहे एका बाबतीत! मतदानाच्या हक्कासाठी तिला संघर्ष करावा लागला नाही! पण खरंच या गोष्टीचं काहीतरी मूल्य तिच्या मनात आहे का? मतदानाचा हक्क तिला आपसुकपणेच लाभलेला आहे पण मतदानाचा अर्थ प्रत्येक भारतीय बाईला कळलाय का? नवर्‍याच्या राजकारणामुळे माझा निवडणुकांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. गेल्या 25 वर्षांत सुमारे सहा सलग विधानसभा निवडणुका लढण्याच्या माझ्या नवर्‍याच्या अनुभवामुळे मला जे काही चित्र दिसलं, ते एक भारतीय माणूस म्हणून मी नोंदवून ठेवतेय माझ्या मनात.

पुढे वाचा

विचारांचा दरवळ

विचारांचा दरवळ

– संजीवनी घळसासी पत्रकार, लेखक, प्रकाशक, संपादक अशा अनेक जबाबदार्‍या एका विशिष्ठ ध्येयाने, निष्ठेने, पूर्ण क्षमतेने, उत्साहाने व आनंदाने पार पाडणारे ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक वाचले. हे पुस्तक त्यांच्या अनेक पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. हे पुस्तक अनेक विषयांना स्पर्श करते व त्यातुन लेखकाचा आदर्शवाद अधोरेखित करते.

पुढे वाचा

आई – एक महान दैवत

आई - एक महान दैवत

द. गो. शिर्के गुरूजींनी लिहिलेल्या आणि ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या वाचकप्रिय पुस्तकातील हे एक प्रकरण. मातृभक्तीचा यथोचित गौरव करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. हे पुस्तक घरपोहच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.

पुढे वाचा

सृजनाचा सुंदर प्रवास

सृजनाचा सुंदर प्रवास

नाशिक येथील युवा पत्रकार आणि वक्ते किरण सोनार यांचा ‘हजार धागे सुखाचे’ हा वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह लवकरच ‘चपराक प्रकाशन’कडून प्रकाशित होत आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांच्या सदिच्छा लाभल्या आहेत. त्यांच्या या भावना खास आपल्यासाठी… किरण सोनार यांच्या कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतील यासाठी विजयाताईंच्या या शब्दांशिवाय आणखी कोणतं परिमाण हवं? किरण सोनार या तरुण लेखकाजवळ एक सुंदर मन आहे, ज्यात कळवळा आहे, कणव आहे, सुंदरतेची अनोखी आस आहे आणि मनाच्या गाभार्‍यात शिवशंकराचं पुण्यशील अधिष्ठान आहे; जे माणूसपण असोशीनं जपतं आणि ते किरणच्या कथांमधन झिरपतं. हे तो कळवळ्याची…

पुढे वाचा

‘काळीजकाटा’ कादंबरीला दोन राज्यस्तरीय पुरस्कार

‘काळीजकाटा’ कादंबरीला दोन राज्यस्तरीय पुरस्कार

पुणे, (प्रतिनिधी) : ‘चपराक‘ने प्रकाशित केलेल्या सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ या कादंबरीला ऑगस्टमध्ये दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी, गदिमा प्रतिष्ठान व नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सांगोला तालुक्यातील चोपडीचे सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.

पुढे वाचा

आरोग्यम् धनसंपदा…

आरोग्यम् धनसंपदा...

‘‘धर्मार्थकाममोक्षानाम् मुलमुक्तम् कलेवरम्। तच्च सर्वार्थसंदिद्धयै भवैद्यदि निरामयम्॥ अर्थात धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरूषार्थ साधण्याला मुख्य साधन मानवाचे शरीर आहे. ते निरोगी असेल तर वरील चारही पुरूषार्थ साध्य होतील, हे त्रिकालाबाधित तत्त्व अनेक साचार, अनुभवी, निरपेक्ष ऋषिंच्या आणि संतांच्या वचनांनी सिद्ध झाले आहे.

पुढे वाचा

स्त्री मनावर फुंकर घालणारा प्रयत्न

स्त्री मनावर फुंकर घालणारा प्रयत्न

सोलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी ‘चपराक प्रकाशन’ची सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ ही कादंबरी वाचून दिलेली प्रतिक्रिया. ही कादंबरी घरपोच मागवण्यासाठी या लिंकला भेट द्या – http://shop.chaprak.com/product/kaalijkaata/

पुढे वाचा