परिवर्तनाची शक्ती देणारी वारी

महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे आणि तरी ते ‘महा राष्ट्र’ आहे. या महाराष्ट्राने समाजाच्या उद्धाराकरिता विचारांची पेरणी केली आहे. या मातीने अनेक विचारवंत दिले. या भूमीने या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला जसे अनेक क्रांतीकारक दिले त्याप्रमाणे समाजाचे उत्थान घडवण्यासाठी विचारवंत देखील दिला आहेत. या भूमीने सतत माणूसपणाचा विचार केला आहे. या मातीत जे उगवले होते त्यामागे विचारांची पेरणी हेच कारण आहे. पेरलेल्या विचारबीजांमुळे येथील भूमी अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे येथील माणसं अधिक विचारप्रवण बनली होती. जे जे म्हणून चांगले आहे त्याचा स्वीकार करत या भूमीत सतत समतेचा लढा उभा…

पुढे वाचा

समाजभूषण : ह. भ. प शांताराम महाराज निम्हण

subhavbhajan shantaram maharaj nimhan

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प शांताराम महाराज निम्हण यांचा आज (दि. 11) पुण्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’ने ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख.

पुढे वाचा

ऊर्जादायी भक्तीसोहळा

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण! मराठी माणसाचे अध्यात्मिक वैभव ठरणारी, सामान्य माणसांत श्रद्धा जागवणारी, त्यांच्यात विश्‍वास निर्माण करणारी आणि भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणारी पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणीही निमंत्रण न देता, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठराविक ठिकाणी पोहोचणारे वारकरी हे जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी मोठे आश्‍चर्य आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत आपापल्या दिंड्या घेऊन या आनंदसोहळ्यात, भक्तीसोहळ्यात सहभागी होणारे वारकरी मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

पुढे वाचा