रामो राजमणिः सदा विजयते.. -श्रीराम ग. पचिंद्रे

भव्य हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट अरण्यात आपल्या ब्रह्मवीणेच्या सुरात ‘नारायण नारायण’ असं नामस्मरण करीत देवर्षी नारद मुक्त संचार करत होते. एकाएकी एका निर्दय दरडावणीने त्यांच्या अखंड नामस्मरणात खंड पडला. समोर एक क्रूर चेहर्‍याचा धिप्पाड दरोडेखोर हातात तळपता परशु घेऊन देवर्षींना मारण्याच्या आविर्भावात उभा होता. ‘‘थांब तिथंच. एक पाऊल जरी पुढं टाकलंस तरी तुझी खांडोळी करीन,’’ दरोडेखोरानं धमकी दिली. देवर्षींची मुद्रा शांतच. त्यांना भयाचा यत्किंचित स्पर्शही झालेला नसल्याचं जाणवत होतं. त्यांनी शांतपणे विचारलं, ‘‘कोण आहेस तू? आणि माझ्याडून काय हवंय तुला?’’ 

पुढे वाचा

पुस्तक परिचय – भारत : पासष्ट पोलादी पाने – अर्थात आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष

पुस्तकाबद्दल ‘भारत-आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष’ हा एक ज्ञानपट आहे. यात वेळोवेळी भारतावर झालेली आक्रमणे, नकाशा यासह माहिती आहे. त्याचबरोबर त्या आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलेे संघर्ष व त्यांना मिळालेले विजय नकाशे व माहितीच्या टिपणासह दाखविलेले आहेत. असे स्वातंत्र्यसंघर्ष प्राचीन काळी चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, पुष्यमित्र, गौतमीपुत्र सातकर्णी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, यशोधर्मन यांनी यवन, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाविरूद्ध केले. मध्य काळात बप्पा रावळ, धंग चंदेल, हरीहर बुक्का, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह यांनी तुर्क व मुघलाविरुद्ध स्वातंत्र्यसंघर्ष केले. अर्वाचीन काळी महादजी शिंदे, इब्राहीम गार्दी, हैदरअली, रण्जितसिंह, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी…

पुढे वाचा