माय लेक -राजेंद्र दिघे

माय नितळ गोडवा लेक साखर पाडवा माय प्रेमाचा निर्झर लेक आनंदी पाझर माय कष्टाची भाकर लेक लाडाची कदर माय सुंदर आभाळ लेक नितळ निर्मळ माय अंगणी तुळस लेक घराची कळस माय प्रेमाचा सागर लेक कुळाचा जागर माय वाढता मांडव लेक नात्यांचा सांकव माय गोकूळ आरसा लेक वंशाचा वारसा माय सुखाचा आगर लेक दुःखाला झालर -राजेंद्र दिघे

पुढे वाचा

भूमी, निसर्ग आणि नात्यांच्या ताटातुटीचे वर्तमान आगंतुकाची स्वगते

भूमी, निसर्ग आणि नात्यांच्या ताटातुटीचे वर्तमान आगंतुकाची स्वगते

अभिव्यक्ती प्रामाणिक असली की थेट हृदयाच्या गाभ्यातून कविता जन्माला येते. मातीच्या मुळापर्यंत गेलं की जोमानं पीक तरारून येतं, हीच गोष्ट कवितेबाबतची. सभोवतालचा अस्वस्थ करणारा काळ मोठा विचित्र आहे. अशावेळी कवीची होणारी अस्वस्थ घालमेल म्हणजे कवितेपूर्वीची स्वतःची सोलुन निघण्याची जणू एक प्रक्रियाच असते. त्यातुन येणारी अस्सल कविता म्हणजे स्वतःला चिंतनातून व्यक्त करणारी एक साधनाच असते.

पुढे वाचा

चिरंतनाची ओढ असणारा कवी

चिरंतनाची ओढ असणारा कवी

स्वतःला प्रतिभासंपन्न म्हणवून घेणार्‍या काही कवींचे कवितेशी असलेले नाते फक्त शब्दांपुरतेच असते पण ज्यांच्या धमन्याधमन्यातून फक्त कविता आणि कविताच वाहत होती असे अपवाद्भूत कवी म्हणून सुधीर मोघे यांचा उल्लेख करावा लागेल. मोघे कवितेत रमले पण इतर प्रांतातही त्यांची मुशाफिरी चालूच राहिली. कवितेबरोबरच पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, निवेदन या क्षेत्रांमध्येही ते लीलया वावरले.

पुढे वाचा

आम्ही कविसंमेलनांची अपत्ये

जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळे छापील स्वरुपात कविता जाणकारांपुढे येण्याचं भाग्य आम्हा कवींना सुरुवातीला लाभलं नाही.

पुढे वाचा