माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहाने वाचले. एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा ते वाचल्यावरच माझे समाधान झाले. रमेश वाघ हे स्वत: उत्तम कीर्तनकार तर आहेतच…
पुढे वाचा