वाचन ही ‘संस्कृती’ आहे काय? – घनश्याम पाटील

भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मनाने किंवा धनाने खूप श्रीमंतच आहेत असंही चित्र नाही. मग तरूण, महाविद्यालयीन मुलं-मुली…

पुढे वाचा

सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50

ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली जाते… ही गोष्ट आहे तीन पिढ्यांनी चालवलेल्या आणि तीन पिढ्यांनी आपलं मानलेल्या एका अशा दिनदर्शिकेची जी आता महाराष्ट्राचे मानचिन्ह…

पुढे वाचा

मृत्युघंटा

मृत्युघंटा

दीपक राइरकर, चंद्रपूर चपराक दिवाळी विशेषांक 2013 भाषा आणि संस्कृती या नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाषा मेली तर संस्कृतीचा विनाश अटळ आहे. तसेच जर एखादी संस्कृती लुप्त होत असेल तर भाषा ही लोप पावणारच. जगातील अनेक भाषा आणि त्याच अनुषंगाने त्याच्याशी निगडीत संस्कृती (किंवा त्याउलट) नामशेष होण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या तपशीलात जाण्याचे कारण नाही. परंतु इथे मुद्दा आहे मराठी भाषा आणि संस्कृती या दोहोंच्या संरक्षणाचा. (संवर्धनाचा मुद्दा खूप नंतरचा) या ठिकाणी भाषेमुळे संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

पुढे वाचा

मराठीतील पहिलं वाक्य

मराठीतील पहिलं वाक्य

जैसी दीपामाजी दिवटी का तीथीमाजी पूर्णिमा गोमटी तैसी भाषामध्ये मर्‍हाटी सर्वोत्तम! संत ज्ञानेश्‍वरांनी वर्णिलेल्या या मराठीतील पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिल्पावर ‘श्री चामुंडराय करविले’ हे 1039 साली कोरलेले आढळते. त्यापूर्वीचही एक वाक्य संशोधनात आढळलय. सोलापूर ते विजापूर या रस्त्यावर कुडल संगमावरील मंदिरात सन 1018 मध्ये कोरलेले वाक्य ‘वांछीतो विजयी होइबा’ हे आहे. जो वाचेल तो आयुष्यात यशस्वी होईल, असा त्याचा अर्थ आहे. मुकुंदराज यांनी सन 1196 मध्ये ‘विवेकसिंधू’ हा काव्यरूप तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ लिहिला.

पुढे वाचा