देह निरांजन झाला – माधव गिर

तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या  मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भगव्या पताका डोलू लागल्या. आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा तापीच्या किनाऱ्यावर विसावला. हे पाहून तापीचा प्रवाह आनंदला! संत जनांची मांदियाळी पाहून त्या प्रवाहाचे डोळे भरून पावले. तो दिवस, हो तोच दिवस, तापी आजपावेतो कधीही विसरली नाही. विसरणारही नाही. तो दिवस होता – ‘वैशाख मासातील वैद्य दशमीचा.’ 

पुढे वाचा

मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान – माधवी देवळाणकर

कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

पुढे वाचा

रामो राजमणिः सदा विजयते.. -श्रीराम ग. पचिंद्रे

भव्य हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट अरण्यात आपल्या ब्रह्मवीणेच्या सुरात ‘नारायण नारायण’ असं नामस्मरण करीत देवर्षी नारद मुक्त संचार करत होते. एकाएकी एका निर्दय दरडावणीने त्यांच्या अखंड नामस्मरणात खंड पडला. समोर एक क्रूर चेहर्‍याचा धिप्पाड दरोडेखोर हातात तळपता परशु घेऊन देवर्षींना मारण्याच्या आविर्भावात उभा होता. ‘‘थांब तिथंच. एक पाऊल जरी पुढं टाकलंस तरी तुझी खांडोळी करीन,’’ दरोडेखोरानं धमकी दिली. देवर्षींची मुद्रा शांतच. त्यांना भयाचा यत्किंचित स्पर्शही झालेला नसल्याचं जाणवत होतं. त्यांनी शांतपणे विचारलं, ‘‘कोण आहेस तू? आणि माझ्याडून काय हवंय तुला?’’ 

पुढे वाचा

कर्तव्यतत्पर प्रभू श्रीरामचंद्र 

महर्षि वाल्मीकींच्या श्रीरामायण या सांस्कृतिक महाकाव्यातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे प्रभू श्रीराम! प्रभू श्रीराम हे हजारो वर्षांपासून आपल्या भारतभूमीतील श्रेष्ठ आराध्यदैवत बनले आहे. आपली वैदिक संस्कृती व पूर्णविकसित अध्यात्मशास्त्र कोणाला तरीच आराध्य कसे मानेल? आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनी आणि संत योग्य आणि सर्वश्रेष्ठच गोष्ट निवडून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवतात. मग सहजच प्रश्न पडेल की मानवी देहात अवतरलेले, मानवाच्या मर्यादेत जीवन व्यतीत केलेले श्रीराम देवत्वाला कसे पोहोचतात? हजारो वर्षे त्यांच्या चरित्राची मोहिनी जनमानसावर कशी राहते, अनेक संत, सत्पुरुष केवळ रामनामाने आपली आध्यात्मिक साधना पूर्णत्वाला नेऊन जीवनाची कृतार्थता साधतात. काय आहे प्रभू श्रीरामचंद्रांचे जीवन?

पुढे वाचा

वारी एक समाजसंस्कार

परिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस , पत्रकार, सुरक्षा कर्मचारी , अत्यावश्यक सेवा पुरवणारे, स्वतः पुढाकार घेऊन किंवा अन्न, साधन, सामग्री…

पुढे वाचा

सराव थांबला, साक्षात्कार हुकला…

आजूबाजूच्या घटना निराश करत असताना, यश हूल देऊन दूर जात असताना, कष्टाने रचलेले इमले डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असतानादेखील ज्याच्या वागण्यातून सकारात्मकता झळकते त्याला लोकं आज वेडा, स्वप्नाळू म्हणतात, पण उद्या त्याचीच एक यशस्वी माणूस म्हणून उदाहरणं देतात.

पुढे वाचा