जागा हो!

जागा हो!

एकदा कोरोनाशी बोलून, तो एवढा क्रूर का वागतोय हे मला त्याला विचारायचं होतं! पण तो तर नजरेला न दिसणारा अदृश्य जीव! कसं काय बोलणार त्याच्याशी? असा विचार करत असताना, मनात विचार आला, अरे परमेश्वरही अदृश्यच आहे तरी आपण त्याच्याशी बोलतो मग कोरोनाशी बोलणं का शक्य नाही? कोरोना मला दिसत नसला तरी देखील मी त्याच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो. तो तशा शांत होता. म्हणून मीच त्याला पहिला प्रश्न केला, ‘‘का रे! तू आमच्याशी एवढा क्रूर पणे का वागतोस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘अरे मी एवढा क्रूर नाही. जरा विचार करून पहा, माझ्यापेक्षा…

पुढे वाचा

माझं बहुमूल्य मत वाया गेलं

माझं बहुमूल्य मत वाया गेलं

ज्या प्रमुख उमेदवाराच्या भरवशावर मी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान केलं होतं ते महत्त्वाचं मत वाया गेलं. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता कुठे उभे आहोत आपण? मला अक्षरशः आपला महाराष्ट्र एका अनाथ मुलासारखा भासायला लागला आहे.

पुढे वाचा

भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?

भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा कोणताही आजार नसून जो या रोगानं मरतो तो गांडू अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी सातत्यानं केली. हे सगळं पाहता वाटतं…

पुढे वाचा

कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेच्या दिशा

कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेच्या दिशा

चपराक दिवाळी अंक 2020 प्रास्ताविक : कोरोनोत्तर काळ हा साधारणपणे पहिल्या जनता कर्फ्यूपासून मानता येईल. कोरोनोत्तर काळ म्हणजे घरकोेंडीचा काळ. घरकोंडीनंतच्या या संक्रमण काळात मराठी विज्ञानकथा कोणत्या दिशेने जावी अथवा जाऊ शकते याचे काही दिग्दर्शन करता येते. कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेच्या दिशांचे सूचन करावयाचे असल्याने आजवरची मराठी विज्ञानकथा कशी आहे? तिची आशयसूत्रे काय आहेत? हा तपशील तसा फार महत्त्वाचा ठरत नाही.

पुढे वाचा