सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50

ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात… ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली जाते… ही गोष्ट आहे तीन पिढ्यांनी चालवलेल्या आणि तीन पिढ्यांनी आपलं मानलेल्या एका अशा दिनदर्शिकेची जी आता महाराष्ट्राचे मानचिन्ह…

पुढे वाचा

लेखणीच्या बळावर आर्थिक झेप कशी उंचावणार?

महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटीहून अधिक आहे. जगभरात दहा कोटीहून अधिक मराठी भाषिक आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या दहा भाषांत मराठी आहे. मराठी भाषेचा इतिहास हा हजार ते बारा वर्षांचा आहे, अशा गोष्टी आम्ही अभिमानाने सांगतो! मात्र केवळ साहित्यनिर्मितीला ‘व्यवसाय’ मानून जगता येईल अशी आजही परिस्थिती नाही. गेल्या दीडशे वर्षात ज्यांनी ज्यांनी मराठी साहित्यनिर्मिती केली त्या सर्वांनी आपला चरितार्थासाठीचा व्यवसाय वेगळा ठेवलाय आणि त्यांचं लेखन त्यांचा छंद म्हणून जोपासला आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः आधुनिक गद्य लेखनाला सुरूवात झाल्यानंतर ते आजअखेर केवळ साहित्यावर उपजिविका चालविणारे अत्यंत अल्प लेखक होऊन गेले.…

पुढे वाचा