पाऊले चालती पंढरीची वाट

Dehu Alandi Pandharpur Wari 2017 Image

पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ ॥ असं म्हणत विठूरायाची लेकरं पावसा-पाण्याची, वादळ-वार्‍याची तमा न बाळगता पंढरपूरला जायला निघतात. संतजनांच्या पालख्या आपापल्या ठिकाणांहून निघतात. एकत्र येतात जणू वेगवेगळ्या सरिताच एकत्र येऊन त्यांचा महासंगम होतो आणि ही भावसरिता त्या पंढरपूरच्या कल्लोळात विलीन होण्यासाठी प्रवाहीत होते. विटेवर उभ्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी, त्याच्या पायावर डोई ठेवण्यासाठी, निदान त्याचं मुखदर्शन घेण्यासाठी, नामदेव पायरीवर नतमस्तक होण्यासाठी, गरूड खांबाला आलिंगण देण्यासाठी, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, अविरत ओढीने, न थकता नाचत-बागडत हे भाविक पंढरपूरची वारी करतात. आषाढी वारी फार महत्त्वाची मानली…

पुढे वाचा

कोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ

latest presidential candidate from bjp for 2017 presidential election

भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना ते दलित असल्याचे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप याचेही राजकारण करणार हे स्पष्टच आहे. यापूर्वी कॉंग्रेसने…

पुढे वाचा

धोका प्रतिक्रियावाद्यांचा!

मध्यंतरी व्हॉट्स ऍपला एक विनोद आला. एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला. देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’ तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे…. पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही…!’’

पुढे वाचा

माणूस केलंत तुम्ही मला…

Image about Kavivarya Mangesh Padgaonkar

इतकं दिलंत, इतकं दिलंत तुम्ही माणूस केलंत तुम्ही मला… असं म्हणणारा एक आनंदयात्री जिप्सी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या जगण्याच्या छटा कवितेतल्या नादमधुर शब्दांमधून आणि आशयपूर्ण भावार्थामधून बदलून गेला. त्यांच्याशी केलेला संवाद म्हणजे क्षणोक्षणीच्या आठवणींचा मोठा ठेवाच. त्यांच्याकडून मिळालेली अक्षरांची शिदोरी म्हणजे तुमच्या असण्यापर्यंतच्या प्रवासाला मिळालेली तारूण्याची पालवीच जणू. त्यांच्या काव्यमैफलीत उपस्थित राहून त्यांनीच वाचलेल्या त्यांच्या कवितेचं आपण केलेलं रसग्रहण म्हणजे, आपल्याच आयुष्यात त्या-त्या वेळच्या प्रसंगाला आठवून मारलेला फेरफटकाच असायचा. इतकं सोपं लिहून त्यांनी त्यांच्या कविता तुमच्या आमच्या केल्या. होय, हे सगळं मी सांगतोय महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्याबद्दल… पाडगावकरांना जेव्हा…

पुढे वाचा

भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे

Bhutdaya image

सुमारे एक लाख वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी शिकारीसाठी दगडाचा हत्यार म्हणून वापर केला. तिथपासून ते आज इंटरनेट क्रांतीपर्यंतचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांचा हा प्रवास अजूनही चालूच आहे. आपले राष्ट्र आणि आपण सारेजण या प्रवासाचे एक भाग आहोत. आज भारताकडे उड्डाणवाहक, मिसाईल्स, विमाने आणि अतीउच्च तंत्रज्ञानाची सगळीच साधने उपलब्ध आहेत. एक सशक्त राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर सन्मान मिळवत असतानाच एक सशक्त निरोगी समाजाची उभारणी करण्याचं आव्हान आजच्या युवा पिढीसमोर आहे. निव्वळ आपण स्वत: आणि स्वत:चं कुटुंब या संकुचित कोषामध्ये राहून जगत राहण्यापेक्षा चंगळवादाची जी झापडं आपण बुद्धीला…

पुढे वाचा

ऊर्जादायी भक्तीसोहळा

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण! मराठी माणसाचे अध्यात्मिक वैभव ठरणारी, सामान्य माणसांत श्रद्धा जागवणारी, त्यांच्यात विश्‍वास निर्माण करणारी आणि भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणारी पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणीही निमंत्रण न देता, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठराविक ठिकाणी पोहोचणारे वारकरी हे जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी मोठे आश्‍चर्य आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत आपापल्या दिंड्या घेऊन या आनंदसोहळ्यात, भक्तीसोहळ्यात सहभागी होणारे वारकरी मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

पुढे वाचा

महिलांच्या विकासाचा निर्धार हाच खरा पुरुषार्थ

सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर आजची स्त्री ही दिवसेंदिवस नुसती शिकत नाही तरी ती सुशिक्षित होऊन आपल्या समाजाला निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते आहे हे चित्र आज सर्वदूर पहायला मिळते आहे.  ह्याची पाळेमुळे एकोणविसाव्या शतकातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी समाजात रुजवून आपल्या समाजावर फार मोठे उपकारच केले आहेत असे नमूद करणे गरजेचे वाटते. ज्या काळी स्त्री ही फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच जन्माला आली आहे असा प्रघात असताना त्यांनी केलेले हे धाडस आज एकविसाव्या शतकात महिलांच्या विकासाकडे पाहिले की जाणवते की त्यांचा स्त्रीशक्तीचा हा विचार किती दूरदृष्टीचा होता आणि आपल्या देशासाठी…

पुढे वाचा

साहित्य चपराक मासिक ऑगस्ट २०१६ अंक

Latest Marathi Masik Sahitya Chaprak August 2016 Ank

साहित्य चपराक ऑगस्ट २०१६ अंक वाचा ऑनलाईन. Read latest marathi magazine Sahitya Chaprak August 2016 ank online for free. साहित्य चपराक ऑगस्ट २०१६ अंक marathi magazines online free reading, read marathi magazine sahitya charprak online for free. Sahitya chaprak latest marathi magazine August 2016 ank available for free reading online. Read marathi masik online for free. Buy marathi books online published by chaprak prakashan online with free home delivery at Chaprak bookstore.

पुढे वाचा

साहित्य चपराक मासिक जुलै २०१६ अंक

Read Marathi Magazine Sahitya Chaprak July 2016 Ank Online For Free

साहित्य चपराक जुलै २०१६ अंक वाचा ऑनलाईन. Read latest marathi magazine Sahitya Chaprak July 2016 ank online for free. साहित्य चपराक जुलै २०१६ अंक marathi magazines online free reading, read marathi magazine sahitya charprak online for free. Sahitya chaprak latest marathi magazine July 2016 ank available for free reading online. Read marathi masik online for free. Buy marathi books online published by chaprak prakashan online with free home delivery at Chaprak bookstore.

पुढे वाचा

सभासद होण्यासाठी ऑनलाईन वर्गणी भरा

Sahitya Chaprak Marathi Masik Magazines Logo

या आधी आपण आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरत होता.  आता तुम्ही साहित्य चपराक मासिकाचे सभासद ऑनलाईन वर्गणी भरून देखील होऊ शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जा. Pay online for marathi masik sahitya chaprak 1 year membership ऑनलाईन वर्गणी भरा.  वर्गणी भरतांना आपला अचूक पत्ता भरा. वर्गणी भरल्यानंतर आपल्याला काही वेळातच ई-मेल (email) आणि एसएमएस (sms) येईल. पैसे भरल्यावर अथवा पैसे भरण्यापूर्वी जर तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला 7057292092 वर अथवा info@chaprak.com वर संपर्क करा. ‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. धन्यवाद.

पुढे वाचा