भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे

Bhutdaya image

सुमारे एक लाख वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी शिकारीसाठी दगडाचा हत्यार म्हणून वापर केला. तिथपासून ते आज इंटरनेट क्रांतीपर्यंतचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांचा हा प्रवास अजूनही चालूच आहे. आपले राष्ट्र आणि आपण सारेजण या प्रवासाचे एक भाग आहोत. आज भारताकडे उड्डाणवाहक, मिसाईल्स, विमाने आणि अतीउच्च तंत्रज्ञानाची सगळीच साधने उपलब्ध आहेत. एक सशक्त राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर सन्मान मिळवत असतानाच एक सशक्त निरोगी समाजाची उभारणी करण्याचं आव्हान आजच्या युवा पिढीसमोर आहे. निव्वळ आपण स्वत: आणि स्वत:चं कुटुंब या संकुचित कोषामध्ये राहून जगत राहण्यापेक्षा चंगळवादाची जी झापडं आपण बुद्धीला…

पुढे वाचा

ऊर्जादायी भक्तीसोहळा

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण! मराठी माणसाचे अध्यात्मिक वैभव ठरणारी, सामान्य माणसांत श्रद्धा जागवणारी, त्यांच्यात विश्‍वास निर्माण करणारी आणि भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणारी पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणीही निमंत्रण न देता, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठराविक ठिकाणी पोहोचणारे वारकरी हे जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी मोठे आश्‍चर्य आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत आपापल्या दिंड्या घेऊन या आनंदसोहळ्यात, भक्तीसोहळ्यात सहभागी होणारे वारकरी मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

पुढे वाचा