साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक Read latest marathi magazine Sahitya Chaprak September 2017 ank online for free. साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक marathi magazines online free reading, read marathi magazine sahitya charprak online for free. Sahitya chaprak latest marathi magazine September 2017 ank available for free reading online. Read marathi masik online for free. Buy marathi books online published by chaprak prakashan online with free home delivery at Chaprak bookstore.
पुढे वाचाTag: marathi magazine
विषमतेचा पाया समता कशी आणणार?
भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही. आदि शंकराचार्य नेमके कोणत्या शतकात झाले, याबाबतचा घोळ मिटलेला नाही. विक्रमादित्य नेमका कोण, हे आजही नीट समजलेले नाही. ते जाऊद्या, आद्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त नेमका कोण होता, हे कष्टाने शोधावे लागते. पण या सार्यामुळे सुसंगत इतिहासाची मांडणी कठीण व दुरापास्त झालेली आहे. या…
पुढे वाचाइतिहासाचे भीष्माचार्य – वा. सी. बेंद्रे
असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
पुढे वाचाविद्यापीठ नेटवर्कींगच्या जाळ्यापुढे ‘स्पायडरमॅन’ नमला
विद्यापीठ हे शिक्षणक्षेत्र. शासकीय विभाग. इतर विभागांसारखेच त्याचे प्रशासकीय संबंध इतर विभागांशी. त्यामध्ये सहसंचालक, संचालक (उच्च शिक्षण विभाग), उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयाचा वित्त व सामान्य प्रशासन विभाग, कुलपती तथा राज्यपाल कार्यालय, राष्ट्रीय मूल्यांकन (नॅक) कार्यालय, बेंगलोर, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली, नियोजन विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, नवी दिल्ली, पोलीस प्रशासन, अनुसूचित जाती-जमाती आयोग, नवी दिल्ली, मानवी हक्क आयोग इत्यादी बरेचसे. अंतर्गत विभाग म्हणजेे प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठाते, अधिसभा सदस्य, कामगार संघटनांचे नेते व काही सेवक, वेगवेगळ्या समित्यांचे सदस्य इत्यादी! आणि बरेचसे…
पुढे वाचाआई मला पंख आहेत पण… (कथा)
एक मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी राहत होते. तिथं खूप सारे खोपे होते. एका खोप्यामध्ये तीन पक्षी होते. आई-बाबा आणि त्यांचे पिलू. दोघांचे आपल्या पिलावर खूप प्रेम होते. पिलू अगदी छोटेसे होते. चोचीतून आई-बाबा त्याला भरवत होते. दिवस जात होते. पिलू वाढत होते. खोप्यामध्येच खेळत होते. ‘तुला पंख आहेत. तू उडू शकतो. बागडू शकतो, पिलाला सांगण्यात आलं. शिकार्याच्या जाळ्यात अडकायचं नाही. सहजपणे मिळालेले अन्न घ्यायचं नाही. कष्टाने शोधूनच पोट भरायचं. असं सगळं आई-बाबा शिकवत होते.
पुढे वाचाधडाकेबाज महेश भागवत
स्वातंत्र्यानंतर खाकी आणि खादी हीच आपल्या देशाची ओळख झाली. मात्र हे दोन्ही घटक इतके बदनाम झाले की लोक खाकी आणि खादीवाल्यांचा सर्वाधिक तिरस्कार करू लागले. त्यांना शिव्या घालू लागले. यांच्यातीलच काहींनी हे क्षेत्र पुरते बदनाम केले. असे असले तरी या क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकानी या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सगळंच काही संपलेलं नाही हा विश्वास निर्माण केला आणि चांगुलपणाच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो तेव्हा व्यवस्थेवरचा, यंत्रणेवरचा विश्वास दृढ होतो. वर्दी अंगावर असतानाही एखादा माणूस सामान्य…
पुढे वाचा‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!
लिहित्या हातांना आवाहन… ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा! ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता.
पुढे वाचा’गर्भ भाड्याने देणे आहे!’
घर भाड्याने देणे आहे, सायकल भाड्याने देणे आहे, टीव्ही भाड्याने देणे आहे, या श्रेणींत मानवी अवयवाने केव्हा स्थान मिळवले, कळलेही नाही. गर्भ भाड्याने देणे आहे किंवा गर्भाशय भाड्याने देणे आहे, काही वर्षांपूर्वी विचित्र वाटलेली या संकल्पना हळूहळू कळत नकळत आमच्या विचारात रुजू लागली आहे, नव्हे समाजात बर्यापैकी प्रस्थापित होऊ लागली आहे. कोणत्याही कारणाने स्त्री बाळाला जन्म देण्यास असमर्थ असेल व इच्छा असूनही तिला किंवा एखाद्या जोडप्याला स्वतःच्या अपत्याचे सौख्य लाभू शकत नसेल, अशा वेळेस त्या स्त्रीचे किंवा दुसर्या स्त्रीचे बीजांड व पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू याचे प्रयोगशाळेत फलन घडवून आणले जाते.…
पुढे वाचासंवाद साधनांद्वारे किती होतोय खराखुरा संवाद?
‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है…’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव खूप सुंदररित्या व्यक्तही झाला आहे.
पुढे वाचाग्रंथ व्यवहार – दशा आणि दिशा
महाराष्ट्रात 1970-80 च्या दरम्यान मोजकेच प्रकाशक होते. त्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि नंतर नाशिकचा समावेश होता. सोलापूरात एक प्रकाशक कार्यरत आहे. दैवयोगाने पूर्वी अनेक मात्तबर लेखक होते. त्यामुळे प्रकाशकांची चलती होती. त्यांच्यात स्पर्धा नव्हती. त्यावेळी प्रकाशकांकडे शालेय क्रमिक पुस्तके असल्याने लाखोंची विक्री व्हायची. त्यातून त्यांनी भव्य इमारती बांधल्या. त्यामुळे त्या संस्था नावारूपाला आल्या.
पुढे वाचा