इतकं दिलंत, इतकं दिलंत तुम्ही माणूस केलंत तुम्ही मला… असं म्हणणारा एक आनंदयात्री जिप्सी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या जगण्याच्या छटा कवितेतल्या नादमधुर शब्दांमधून आणि आशयपूर्ण भावार्थामधून बदलून गेला. त्यांच्याशी केलेला संवाद म्हणजे क्षणोक्षणीच्या आठवणींचा मोठा ठेवाच. त्यांच्याकडून मिळालेली अक्षरांची शिदोरी म्हणजे तुमच्या असण्यापर्यंतच्या प्रवासाला मिळालेली तारूण्याची पालवीच जणू. त्यांच्या काव्यमैफलीत उपस्थित राहून त्यांनीच वाचलेल्या त्यांच्या कवितेचं आपण केलेलं रसग्रहण म्हणजे, आपल्याच आयुष्यात त्या-त्या वेळच्या प्रसंगाला आठवून मारलेला फेरफटकाच असायचा. इतकं सोपं लिहून त्यांनी त्यांच्या कविता तुमच्या आमच्या केल्या. होय, हे सगळं मी सांगतोय महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्याबद्दल… पाडगावकरांना जेव्हा…
पुढे वाचा