विषमतेचा पाया समता कशी आणणार?

भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही. आदि शंकराचार्य नेमके कोणत्या शतकात झाले, याबाबतचा घोळ मिटलेला नाही. विक्रमादित्य नेमका कोण, हे आजही नीट समजलेले नाही. ते जाऊद्या, आद्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त नेमका कोण होता, हे कष्टाने शोधावे लागते. पण या सार्‍यामुळे सुसंगत इतिहासाची मांडणी कठीण व दुरापास्त झालेली आहे. या…

पुढे वाचा

भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे

Bhutdaya image

सुमारे एक लाख वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी शिकारीसाठी दगडाचा हत्यार म्हणून वापर केला. तिथपासून ते आज इंटरनेट क्रांतीपर्यंतचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांचा हा प्रवास अजूनही चालूच आहे. आपले राष्ट्र आणि आपण सारेजण या प्रवासाचे एक भाग आहोत. आज भारताकडे उड्डाणवाहक, मिसाईल्स, विमाने आणि अतीउच्च तंत्रज्ञानाची सगळीच साधने उपलब्ध आहेत. एक सशक्त राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर सन्मान मिळवत असतानाच एक सशक्त निरोगी समाजाची उभारणी करण्याचं आव्हान आजच्या युवा पिढीसमोर आहे. निव्वळ आपण स्वत: आणि स्वत:चं कुटुंब या संकुचित कोषामध्ये राहून जगत राहण्यापेक्षा चंगळवादाची जी झापडं आपण बुद्धीला…

पुढे वाचा