मोदी युग 2 परफॉर्मन्स व पॉप्युलॅरिटी

article by dadumiya

दादूमियॉं राजकीय अभ्यासक, बडोदा चलभाष : 9106621872 मला शनिवारी रात्री दहा वाजता कोल्हटकरांचा फोन आला. मी दवाखान्यातून नुकताच घरी आलो होतो व जेवण घ्यायच्या तयारीत होतो. फोनवर मला कोल्हटकर म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमच्या मोदींना मानले. ते पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून येणार यात शंका नाही.’’ ‘‘कोल्हटकर, तुम्हाला एकदम काय झाले? संध्याकाळी तर तुम्ही राहुलच्या बाजूने बोलत होतात?’

पुढे वाचा

कोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ

latest presidential candidate from bjp for 2017 presidential election

भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना ते दलित असल्याचे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप याचेही राजकारण करणार हे स्पष्टच आहे. यापूर्वी कॉंग्रेसने…

पुढे वाचा

गाय, वाद आणि उपयोगिता

सध्या गाईवरून देशभरात चांगलेच रणकंदन सुरू आहे. गाई वाचवण्यासाठी स्वयंघोषित गोरक्षक वाटेल तसा धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे गाईच्या उपयोगिता मुल्यावर चर्चा होण्यापेक्षा तिच्या धार्मिक मुद्द्यावरच जास्त गोंधळ होऊ लागला आहे. काही विचारवंत तर गोवंश आधारित शेती आता कालबाह्य झाली आहे. गाय कधी नव्हे तेवढा अनुपयुक्त पशू ठरला आहे, अशाही बिनदिक्कत भांडवली थापा मारत सुटले आहेत. मुळात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम डोळ्यांसमोर दिसत असताना. गोवंश आधारित शेती कालबाह्य ठरल्याची बतावणी करणे, खरे तर किव आणणारे आहे. देशी गोवंशाच्या आधारे विषमुक्त अन्न पिकवता येऊ शकते. याचे सप्रमाण उदाहरण पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दाखवून…

पुढे वाचा