‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है…’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव खूप सुंदररित्या व्यक्तही झाला आहे.
पुढे वाचाTag: social media
धोका प्रतिक्रियावाद्यांचा!
मध्यंतरी व्हॉट्स ऍपला एक विनोद आला. एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला. देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’ तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे…. पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही…!’’
पुढे वाचा