पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ ॥ असं म्हणत विठूरायाची लेकरं पावसा-पाण्याची, वादळ-वार्याची तमा न बाळगता पंढरपूरला जायला निघतात. संतजनांच्या पालख्या आपापल्या ठिकाणांहून निघतात. एकत्र येतात जणू वेगवेगळ्या सरिताच एकत्र येऊन त्यांचा महासंगम होतो आणि ही भावसरिता त्या पंढरपूरच्या कल्लोळात विलीन होण्यासाठी प्रवाहीत होते. विटेवर उभ्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी, त्याच्या पायावर डोई ठेवण्यासाठी, निदान त्याचं मुखदर्शन घेण्यासाठी, नामदेव पायरीवर नतमस्तक होण्यासाठी, गरूड खांबाला आलिंगण देण्यासाठी, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, अविरत ओढीने, न थकता नाचत-बागडत हे भाविक पंढरपूरची वारी करतात. आषाढी वारी फार महत्त्वाची मानली…
पुढे वाचाAuthor: निलीमा कुलकर्णी
लातूर, मो. 8149903283