‘चपराक मासिक – व्यापार आणि उद्योग विशेषांक 2011’ – अरुण रामतीर्थकर कोल्हापूरची चप्पल जशी प्रसिद्ध आहे त्यापेक्षा किती तरी पट अधिक सोलापूरी चादर प्रसिद्ध आहे. घर म्हटले की, त्यात चार-पाच चादरी असतातच. त्या सोलापुरी असाव्यात असा गृहिणींचा आग्रह असतो. सोलापूरची माहेरवाशीण असो वा सासरवाशीण जाता येता ‘आमच्यासाठी दोन चादरी आण हं’ असे दोन-तीन निरोप तिच्याजवळ असतातच. चादरीच्या जोडीला आता टॉवेल, नॅपकीन आणि वॉलहँगिंग यांचीही निर्मिती होत असून काही वर्षांपूर्वी या व्यवसायाची सोलापुरातील वार्षिक उलाढाल हजार कोटींपर्यंत गेली होती.
पुढे वाचाTag: chaprak magazine
विषमतेचा पाया समता कशी आणणार?
भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही. आदि शंकराचार्य नेमके कोणत्या शतकात झाले, याबाबतचा घोळ मिटलेला नाही. विक्रमादित्य नेमका कोण, हे आजही नीट समजलेले नाही. ते जाऊद्या, आद्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त नेमका कोण होता, हे कष्टाने शोधावे लागते. पण या सार्यामुळे सुसंगत इतिहासाची मांडणी कठीण व दुरापास्त झालेली आहे. या…
पुढे वाचावास्तवातील कैद
कल्पनेच्या जगात वावरत असताना कधीतरी मान वर करून बघावं, नकळत खूप काही दिसतं. नेमकं कुठं अन् कोणाकडं बघावं, कुठं लक्ष केंद्रीत करावं हे आपल्यावर असतं. मी असंच कल्पनेच्या जगात परंतु वास्तवरूपात जगत होते. तहान नाही, भूक नाही, झोप नाही, काही म्हणजे काहीच नाही. मनमुराद चाललं होतं सगळं! आनंदात कसलीच फिकिर नाही, की कसलीच चिंता नाही. अश्या वातावरणात बागडत असताना खर्या जगाची चाहूल लागता कामा नये. जर असं झालंच तर आतडे पिळवटून जातात, हातपाय निकामी होतात; नेमकं काय करावं हेच त्यावेळी सुचत नाही. मग समोर कोणीही येवो, ‘चल रे हो बाजूला, काय…
पुढे वाचाधडाकेबाज महेश भागवत
स्वातंत्र्यानंतर खाकी आणि खादी हीच आपल्या देशाची ओळख झाली. मात्र हे दोन्ही घटक इतके बदनाम झाले की लोक खाकी आणि खादीवाल्यांचा सर्वाधिक तिरस्कार करू लागले. त्यांना शिव्या घालू लागले. यांच्यातीलच काहींनी हे क्षेत्र पुरते बदनाम केले. असे असले तरी या क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकानी या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सगळंच काही संपलेलं नाही हा विश्वास निर्माण केला आणि चांगुलपणाच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो तेव्हा व्यवस्थेवरचा, यंत्रणेवरचा विश्वास दृढ होतो. वर्दी अंगावर असतानाही एखादा माणूस सामान्य…
पुढे वाचा’गर्भ भाड्याने देणे आहे!’
घर भाड्याने देणे आहे, सायकल भाड्याने देणे आहे, टीव्ही भाड्याने देणे आहे, या श्रेणींत मानवी अवयवाने केव्हा स्थान मिळवले, कळलेही नाही. गर्भ भाड्याने देणे आहे किंवा गर्भाशय भाड्याने देणे आहे, काही वर्षांपूर्वी विचित्र वाटलेली या संकल्पना हळूहळू कळत नकळत आमच्या विचारात रुजू लागली आहे, नव्हे समाजात बर्यापैकी प्रस्थापित होऊ लागली आहे. कोणत्याही कारणाने स्त्री बाळाला जन्म देण्यास असमर्थ असेल व इच्छा असूनही तिला किंवा एखाद्या जोडप्याला स्वतःच्या अपत्याचे सौख्य लाभू शकत नसेल, अशा वेळेस त्या स्त्रीचे किंवा दुसर्या स्त्रीचे बीजांड व पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू याचे प्रयोगशाळेत फलन घडवून आणले जाते.…
पुढे वाचासंवाद साधनांद्वारे किती होतोय खराखुरा संवाद?
‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है…’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव खूप सुंदररित्या व्यक्तही झाला आहे.
पुढे वाचासुंदर आठवणींचा सुंदर गोफ
खरंतर मी मनात गुंफलेला हा सुंदर आठवणींचा सुंदर गोफ आहे का? हा माझा मलाच पडलेला प्रश्न! जेव्हा मी उत्तर शोधायला जाते तेव्हा जगण्याचे अनेक पदर उलगडतात. मला तो काळ अजूनही पुसटसा आठवतोय. जास्त काही नाही पण पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा! तेव्हा मी चौदा ते पंधरा वर्षांची असेन. त्यावेळी सुट्टी असली की मी आजोळी रहायला आजीकडे जायचे. आजीचं गाव माझ्या गावापासून जेमतेम सात-आठ किलोमीटर अंतरावर होतं. मामा-मामी, मामाची मुलं असं कुटुंब. आजोबांचा मोठा टोलेजंग वाडा होता! त्या वाड्यात सगळे भाऊ एकत्र रहायचे… त्याला घोलकर वाडा म्हटलं जायचं. गावाच्या वेशीतून आत गेल्यावर…
पुढे वाचाप्रशासकीय खेळीतील माहिती अधिकाराची भूमिका
माहितीचा अधिकार हा नियम किंवा कायदा सन 2005 मध्ये अस्तित्वात आला. त्याकरिता अण्णा हजारे यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. त्यांनी उपोषण, मौनवृत याद्वारे शासनाला हा कायदा अस्तित्वात आणण्यास भाग पाडले. कारण या कायद्याबाबत शासनव्यवस्था व राजकारणी हे चालढकल करीत होते. अशा नाकर्तेपणामुळेच अण्णा हजारे यांना हा मौनव्रत व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या कायद्याचा फायदा प्रत्येक घटकास झाला. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू लागले. त्यांना एक प्रकारे माहिती अधिकार नियमाचा वापर करून शासनाकडूनच न्याय मिळू लागला. इतकेच नव्हे तर माहिती अधिकाराची एक वेगळी चळवळच सुरू झाली. काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था याचा वापर करून…
पुढे वाचाएकाच या जन्मी जणू…
इतक्यात वटपौर्णिमा संदर्भात एक वेगळी बातमी टिव्हीवर पाहिली व वर्तमानपत्रात देखील वाचली. ती बातमी म्हणजे वटपौर्णिमेला पुरुषांनीही पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून वडाला फे-या मारल्या व वडाची पूजा केली. आणि हा उपक्रम स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारा आहे असे सांगण्यात आले.
पुढे वाचाअगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू क्षण!
काही क्षण हे असे असतात की जे काळजात खोलवर रुतून बसलेले असतात. आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा हे क्षण असे काही छळतात ना की विचारू नका! ह्या क्षणांचे गणित जरा वेगळेच असते. ते काय व कसे आपल्या स्मृतीपटलावर अवचित उमटून जाते ना तेच तर कधी कधी कळतच नाही. त्यात जर का हे क्षण प्रेमाचे असतील ना तर काही विचारूच नका. मनाची जी काही हळवी आणि केविलवाणी अवस्था होऊन जाते ना की पहायलाच नको! हेच ते क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात आधी कधी तरी येऊन गेलेले असतात; पण त्यावेळेस त्या क्षणांचे महत्त्व…
पुढे वाचा