संसदीय लोकशाहीला सुरूवात होऊन फार काळ उलटला नसल्याने आपल्याकडे राजकीय पक्षांचा इतिहास तसा जुना नाही. राजेशाही संपली, सरंजामशाही संपली, संस्थाने खालसा झाली आणि लोकांच्या कल्याणासाठी त्या त्या ध्येयवादी गटाने पुढाकार घेत आपापल्या विचारधारांचे गट स्थापन केले. त्यांना राजकीय पक्षांचे स्वरूप आले. लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला. किमान तसा भास निर्माण करण्यात आला. त्यातून आपल्या लोकशाहीचा प्रवास सुरू झाला. पूर्वीच्या काळातल्या टोळ्या नष्ट झाल्या आणि विचारसमूह अस्तित्वात आले. आजचे चित्र पाहता या पक्षांच्या पुन्हा टोळ्या झाल्यात की काय? असे वाटावे इतके झपाट्याने हे चित्र बदलले आहे.
पुढे वाचाTag: maharashtra rajkaran
कॅलिडोस्कोप – हायव्होल्टेज ड्राम्यांचा!
केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली आणि चर्चा सुरू झाली ती हायव्होल्टेज ड्राम्याची! एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडणे आणि त्याभोवती सगळे गरगरा फिरणे म्हणजे हायव्होल्टेज!
पुढे वाचानारायणऽऽ नारायणऽऽऽ
प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामैय्या वनवासात होते. चौदा वर्षांचा वनवास होता. वनवासाचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी लवकर उठून लक्ष्मणानं सरपण आणायचं, कंदमुळं आणायची! सीतामाईंनी भोजनाची व्यवस्था करायची! रामानं संरक्षण करायचं! दिवसभर प्रवास करायचा आणि आजूबाजूच्या परिसराचं निरिक्षण करून मुक्कामाची जागा रामानं निश्चित करायची. लक्ष्मणानं झोपडी उभी करायची. आवश्यक ते सामान आणायचं. सीतामाईनं जमेल तसं रांधायचं… दिवसभर एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करायच्या. एकमेकांशी अतिशय प्रेमानं वागायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. असा प्रवास सुरू असताना एकेदिवशी लक्ष्मण वैतागला. त्यानं सांगितलं, ‘‘मी मूर्ख आहे म्हणून तुमच्याबरोबर आलो. इथं येऊन मला लाकडं गोळा करावी…
पुढे वाचामहाराष्ट्रासमोरील मोठे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व असलं तरी त्यांच्याकडे गांभीर्यानं पहाण्याचा द़ृष्टीकोन कमी होतोय.
पुढे वाचादादा वाक्यं प्रमाणम्
यशवंतराव चव्हाण यांनी एकदा सांगितलं होतं की, ‘‘आमच्या पुढार्यांना ‘नाही’ म्हणायची सवय नाही आणि आमच्या अधिकार्यांना ‘हो’ म्हणता येत नाही. सामान्य माणसाला त्याचं काम होईल असं सांगणारे अधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्याचे जे काम करणे शक्य होणार नाही त्यांना स्पष्टपणे नाही म्हणणारे नेते मला हवेेत.’’
पुढे वाचा