सरीवर सरी – श्रद्धा बेलसरे-खारकर

सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांचे हे नवे सदर या अंकापासून देत आहोत. बेलसरे यांचे ‘मोरपंखी’, ‘आजकाल’ आणि ‘फाईल व इतर कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘टिकली तर टिकली’ हा ललितलेखसंग्रह आणि ‘सोयरे’ हा व्यक्तिचित्रणाचा संग्रह प्रकाशित आहे. त्यांचे ‘डबल बेल’ हे एस.टी.मधील अभिनव उपक्रमाचे अनुभवकथनही प्रकाशित आहे. त्यांनी अनेक मान्यवर वृत्तपत्रांसाठी सदर लेखन केले असून त्यांना ‘कवी कट्टी’, ‘पद्मश्री विखे पाटील’, दूरदर्शनचा ‘हिरकणी’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या आठ मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे अनुभवांचे संचित मोठे आहे.…

पुढे वाचा

मराठी माणसाचा ‘शेअर’ चढताच!

‘मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे पडतो’, असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? शेअर मार्केटमध्येही गुजराती-मारवाडी माणूसच पुढे आहे, असा गैरसमज उराशी बाळगून अनेकजण न्यूनगंडात का राहतात? मराठी माणसाचा शेअर नेमका कसा आणि किती वाढतो आहे, याबाबतचा डोळे उघडणारा आणि सकारात्मक चर्चा करणारा हा लेख. कालनिर्णयचे संचालक श्री. जयेंद्र साळगांवकर यांनी टिपलेले हे वास्तव निश्चितच प्रेरणादायी आहे. जरूर ऐका. अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी ‘चपराक’ युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा…

पुढे वाचा

आर्थिक साक्षरता- अरूण दीक्षित

उत्पन्नाचे दोन प्रकार असतात. हे उत्पन्न वापरायचे काही निकष आहेत. पैसे हाताळण्याच्या पण पद्धती आहेत. जो माणूस पैशाकरता काम करत असताना, हळूहळू त्यालाच आपला गुलाम बनवायला शिकतो, कालांतराने त्याच्या जीवनात अशी वेळ येते की, आता त्याच्याकरता फक्त पैसाच काम करुन दर महिन्याला त्याला उत्पन्न आणून देतो. तो स्वतः आता पैशाकरता काम करायचं बंद करतो. आपले आयुष्य मस्त जगत राहतो.

पुढे वाचा

‘हरी नरके आणि संजय सोनवणी यांची मित्तरकथा’

प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी पुरोगामी चळवळीचा म्होरक्या काळाआड गेला, म्हणून गळे काढले. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांपासून ते अनेकांनी आपण किती दुःखात आहोत, याचे ‘प्रदर्शन’ घडवले. यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची मित्तरकथा सर्वज्ञात आहे. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कसे चुकीचे उपचार झाले याबाबतचा एक व्हाटसअप संदेश सोनवणींना पाठवला होता.…

पुढे वाचा

छत्रपती शिवाजीराजांचे व्यापारविषयक धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. रायगड ही मराठ्यांची नवी राजधानी म्हणून ओळखली जावू लागली. रायगडावर महाराजांनी राजदरबारापासून विविध इमारती बांधल्या. रायगड हा सुसज्ज गड तयार केला. रायगडावरील भव्य, देखणी व सुसज्ज बाजारपेठ हे शिवाजी राजांच्या व्यापारविषयक धोरणांवर प्रकाश टाकते.

पुढे वाचा

नारायणऽऽ नारायणऽऽऽ

प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामैय्या वनवासात होते. चौदा वर्षांचा वनवास होता. वनवासाचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी लवकर उठून लक्ष्मणानं सरपण आणायचं, कंदमुळं आणायची! सीतामाईंनी भोजनाची व्यवस्था करायची! रामानं संरक्षण करायचं! दिवसभर प्रवास करायचा आणि आजूबाजूच्या परिसराचं निरिक्षण करून मुक्कामाची जागा रामानं निश्चित करायची. लक्ष्मणानं झोपडी उभी करायची. आवश्यक ते सामान आणायचं. सीतामाईनं जमेल तसं रांधायचं… दिवसभर एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करायच्या. एकमेकांशी अतिशय प्रेमानं वागायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. असा प्रवास सुरू असताना एकेदिवशी लक्ष्मण वैतागला. त्यानं सांगितलं, ‘‘मी मूर्ख आहे म्हणून तुमच्याबरोबर आलो. इथं येऊन मला लाकडं गोळा करावी…

पुढे वाचा