मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो. आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही.
पुढे वाचाTag: Sanjay Sonwani
शैवयोगिनी लल्लेश्वरी!
– संजय सोनवणी, पुणे 9860991205 साहित्य चपराक, दिवाळी विशेषांक 2020 हा अंक घरपोच मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 काश्मीर अप्रतिम, निसर्गदृष्ट्या भुतलावरील नंदनवन म्हणून जसे जगप्रसिद्ध आहे तसेच अनेक अभिनव तत्त्वज्ञानांचे, साहित्यनिर्मितीचे आणि विचारांचेही नंदनवन राहिलेले आहे. काश्मीर अनेक शतके दक्षिण आशियाचे ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. येथेच शैव तत्त्वज्ञानाने अभिनव गुप्ताच्या रुपाने कळस गाठला तर चीन, कोरिया, अफगाणिस्तान, चायनीज तुर्क्मेनीस्तान, तुर्कस्तान या विशाल भुप्रदेशात गेलेला बौद्ध धर्म ही काश्मीरचीच वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती. शैव आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचा संगम करुन बनवला गेलेला हा बौद्ध धर्म जगाने स्वीकारला. येथेच हजारो संस्कृत,…
पुढे वाचा‘सुवर्णपर्व’
‘चपराक’ परिवाराचे सदस्य, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक संजय सोनवणी यांचा ‘काश्मीरचा सम्राट ललितादित्य’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘चिनार पब्लिशर्स’ने प्रकाशित केलाय. या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभलीय. ती खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी…
पुढे वाचानवधर्म स्वीकृतीचा हा मार्ग कितपत योग्य?
डॉ. आंबेडकर यांनी दि. 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे धम्मदीक्षेप्रसंगी दिलेल्या 22 प्रतिज्ञा.
पुढे वाचाया पुरातन जलविज्ञानाचे किती वाटोळे करणार?
आज महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट आले आहे. गावोगावी शेतीला सोडा, प्यायला पाणी नाही. धरणांतील जलसाठा सरासरी 45 टक्क्यांवर आला आहे. मृत जलसाठे वापरायची वेळ लवकरच येणार आहे. हे निसर्गनिर्मित संकट नसून मानवनिर्मित संकट आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. ऊस, नारंगी-संत्र्यांसारखी चुकीच्या जलखाऊ पीकपद्धतींनी पाण्याची अक्षम्य उधळपट्टी होत आहे. त्यात आम्ही आमच्याच पूर्वजांनी शोधलेल्या शाश्वत जलपुरवठा पद्धतींचा विनाश करत आणला आहे. बारव हा त्यातीलच एक जलव्यवस्थापनाचा लोकोपयोगी प्रकार. पूर्वी महाराष्ट्रात खेडोपाडी 15 हजारांच्या आसपास बारवा होत्या.. त्यातील हजारो केवळ दुर्लक्षामुळे निरुपयोगी झाल्या आहेत. अनेक बुजवण्यात आल्या आहेत. आज गरज…
पुढे वाचा…पण बौद्धिक मागासलेपणाचे आम्ही काय करणार?
मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीची वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही. मग तो धर्मविचार असो की राजकीय विचार, अर्थविचार असो की सामाजिक विचार! अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वयंविचारांची जोड देत एक स्वत:चे विचारविश्व बनवत असतो. अशा अगणित विचारांच्या संदर्भव्यूहात विचारकलह निर्माण होणे स्वाभाविक आहे. तसे घडतेही.…
पुढे वाचापुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती!
फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपूर्ण बुद्धीनिष्ठेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देऊ शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजणारे हे शतमूर्ख ज्ञानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळूनही विद्वत-अडाणी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हणजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातून हे लोक बाहेर कधी येतील ते येओत. वाद या शब्दाचा अर्थ तरी यांना नीट कधी समजला आहे काय? वाद तुल्यबळ वैचारिक पक्षांमध्येच होऊ शकतो. ज्यांना मुळात विचार कशाशी खातात याचेच ज्ञान नाही…
पुढे वाचावा. ना. उत्पात यांचा ‘चपराक’कडे खुलासा
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव ‘अहल्या’ असावे अशी अपेक्षा साहित्यिक आणि विचारवंत वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर धनगर बांधवात असंतोष पसरला होता. समाजशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उत्पातांचे विधान सप्रमाण खोडून काढले. ‘चपराक’ने हे वृत्त प्रकाशित करताच वा. ना. उत्पात यांनी त्यांचा खुलासा ‘चपराक’कडे पाठवला आहे. तो त्यांच्याच शब्दात. पुण्याश्लोकी अहिल्याबाईंच्या नावाला माझा विरोध नाही – उत्पात सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोकी अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असे दुरूस्त करावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. अहल्याबाईंची थोरवी सर्व भारतात बद्रीनाथ ते कन्याकुमारी…
पुढे वाचाअहिल्यादेवी हेच नाव बरोबर!
वा. ना. उत्पातांनी समाजाची माफी मागावी संजय सोनवणी यांची मागणी होळकर घराण्याबाबत वारंवार खोटे आक्षेप घेत प्रवाद पसरवले जातात. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यासही होळकरांबद्दल असलेल्या असुयेपोटी विरोध केला जात होता. ‘विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिले तर समाजात तेढ माजेल’ असे वादग्रस्त विधानही शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी केले होते. आता विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर ज्यांचा पोटशूळ उठला आहे ते आता अनैतिहासिक वायफळ वाद उकरुन काढत आहेत. यामुळे समाजात नाराजी पसरली असून धनगर समाजाची एक तरी मागणी मान्य झाली म्हणून झालेल्या आनंदावर विरजण घालण्याचा अक्षम्य प्रकार श्री. उत्पातांकडून घडला आहे. – संजय…
पुढे वाचास्वत: प्रथम हिंदू व्हा!
माझे मित्र प्रशांत आर्वे यांनी माझ्या हिंदू धर्म आणि वैदिक धर्म स्वतंत्र आहेत या सिद्धांतावर आक्षेप घेत एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी भारतात घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख करत माझे मत हे समाजशास्त्रीयदृष्ट्या कसे विघातक ठरू शकते हे दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. तो ‘साहित्य चपराक’च्या जानेवारीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला. या निमित्ताने सांस्कृतिक चर्चेला महाराष्ट्रात बहर येऊ पाहतो आहे हे निश्चितच सुखावह आहे. त्यांच्या आक्षेपांना सविस्तर उत्तर देणे हे महत्त्वाचे आहे कारण हे व असे आक्षेप माझ्यावर घेतले गेले आहेत. या सर्वांनाच एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न मी या प्रत्युत्तरात्मक लेखात करणार…
पुढे वाचा