डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)

ही तीन उदाहरणं बघा – 01 बारामतीतील एक तरुण. लॉकडाऊनमुळे मोठा व्यवसाय ठप्प पडलेला. करायचं काय? घरात शेती. नातेवाईकांची शेती. शेतीत बऱ्यापैकी भाज्या घेतलेल्या पण लॉकडाऊनच्या काळात भाजी विकणार तरी कुठे आणि कसे? मित्राच्या सल्ल्यानं त्यानं डिजीटल मार्केटिंगचा पर्याय निवडला आणि अवघ्या आठ दिवसात त्याला तीन दुकानात मासिक किमान ८० हजार रुपयांच्या भाजीची कायमस्वरुपी ऑर्डर मिळाली. त्याचा उत्साह शतपटीने वाढला.

पुढे वाचा

आई मला पंख आहेत पण… (कथा)

एक मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी राहत होते. तिथं खूप सारे खोपे होते. एका खोप्यामध्ये तीन पक्षी होते. आई-बाबा आणि त्यांचे पिलू. दोघांचे आपल्या पिलावर खूप प्रेम होते. पिलू अगदी छोटेसे होते. चोचीतून आई-बाबा त्याला भरवत होते. दिवस जात होते. पिलू वाढत होते. खोप्यामध्येच खेळत होते. ‘तुला पंख आहेत. तू उडू शकतो. बागडू शकतो, पिलाला सांगण्यात आलं. शिकार्‍याच्या जाळ्यात अडकायचं नाही. सहजपणे मिळालेले अन्न घ्यायचं नाही. कष्टाने शोधूनच पोट भरायचं. असं सगळं आई-बाबा शिकवत होते.

पुढे वाचा