कथा हा अतिशय लवचिक असा वाङमयप्रकार आहे. संस्कृतिच्या प्रारंभापासून कविता आणि कथा लिहिल्या जातात. पुढे नाटक आले. म्हणजे साहित्याचे हे मूळ आविष्कार रूपे होत. कथा ही लवचिक असल्यामुळे ती असंख्य रुपात व्यक्त झालेली आहे. होऊ शकते. लघुत्तम कथा, लघुकथा, गोष्ट, कथा, दीर्घकथा, धक्कांतिका अशा विविध रुपात कथा लिहिली गेली. कमीत कमी अवकाशात खूप काही सूचित करण्याचे सामर्थ्य कथा या वाङ्मय प्रकारात असते. शिवाय काही अनुभवच असे असतात की, कथेशिवाय ते अनुभव इतरत्र व्यक्त होऊच शकत नाहीत. एक प्रकारची अपरिहार्यताच तेथे असते. येथे ’सारांश कथा’ हा एक प्रयोग आहे. कमीत कमी…
पुढे वाचाTag: diwali ank
झिपरीचा माळ – समीर गायकवाड
गावातल्या सगळ्या गल्ल्या ओलांडून डाव्या अंगाने गावाबाहेर पडलं की आमराई लागते. आमराईतून जाताना सावल्यांचा काचबंदी खेळ अंगावर झुलत राहतो. कवडशांच्या गर्दीतून अंग झटकत दोन कोस चालत गेलं की आधी केकताडांनी वेढलेला झिपरीचा माळ लागतो. दहा-बारा एकराचं हे सगळं रान सुपीक मातीचं पण इथं नांगराचा फाळ कधी लागला होता हे गावातल्या कुणालाच सांगता येत नव्हतं. काळीभोर मऊशार जमीन असल्यानं घासगवतापासून बोरी-बाभळीपर्यंतची सगळी झाडं एकमेकाच्या अंगाला खेटून पार फांदीत गळे गुतवून ताठ उभी होती. आमराईपासून नजर टाकली की हे एक जंगलच वाटे. भरीस रात्रंदिवस कानावर पडणारे पक्षांचे हरतऱ्हेचे आवाज आणि जोडीला मोकाट…
पुढे वाचागरज पर्यावरणीय अणीबाणीची…
जागतिक तापमान वाढ (Global Warming) आणि वातावरण बदल (Climate Change) हे आता सर्वच माध्यमांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी रोजच्या परिचयाचे शब्द होऊन बसले आहेत परंतु त्यांच्या परिणामांच्या खर्या स्वरूपाची ओळख किंवा त्यांच्या परिणामांच्या दाहकतेचा अंदाज काही तुरळक अपवाद म्हणजे अपूर्णांकातली लोकसंख्या वगळता अजून बहुतांश लोकसंख्येला आलेला नाही.
पुढे वाचापेच – कथा
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवी, लेखक बंडा जोशी यांची ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकातील ही कथा अवश्य वाचा.
पुढे वाचा‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!
लिहित्या हातांना आवाहन… ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा! ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता.
पुढे वाचाचपराक दिवाळी अंक २०१५ – ऑनलाईन विकत घ्या
वाचकमित्रांनो नमस्कार! वैविध्यपूर्ण साहित्याने नटलेला ‘चपराक’चा दिवाळी विशेषांक सोमवार दि. 2 नोव्हेंबर 2015 रोजी आपल्या भेटीस येत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ह. मो. मराठे, नागनाथ कोत्तापल्ले, भाऊ तोरसेकर, प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, सुधीर गाडगीळ, प्रा. मिलिंद जोशी, सदानंद भणगे, पराग करंदीकर, अरूण खोरे, वासुदेव कुलकर्णी, शेखर जोशी, प्रा. रवींद्र शोभणे, प्रा. द. ता. भोसले, डॉ. न. म. जोशी, संजय सोनवणी, अंजली कुलकर्णी, श्रीराम पचिंद्रे, डॉ. भास्कर बडे, प्रा. श्रीपाल सबनीस, प्रा. बी. एन. चौधरी, सुधीर जोगळेकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, श्रीपाद ब्रह्मे, विद्या देवधर, सुवर्णा जाधव, उमेश सणस, मनिषा वाणी,…
पुढे वाचा